Homeguard Salary Hike | राज्यातील 55 हजार होमगार्डसाठी आनंदाची बातमी; मानधनात केली दुप्पटीने वाढ

0
1
Homeguard Salary Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Homeguard Salary Hike | राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत. अशातच आता दसऱ्यानिमित्त सरकारने राज्यातील होमगार्ड्सला एक मोठे गिफ्ट दिलेले आहे. ते म्हणजे आता होमगार्डच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि हे होमगार्डचे मानधन देशातील सर्वात जास्त मानधन असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच विविध भत्तांची रक्कम देखील दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डची (Homeguard Salary Hike खूप मदत असते. परंतु त्यांचे मानधन खूपच कमी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या संदर्भात अनेक . लोकांनी आवाज देखील उठवलात्यानंतर होमगार्डच्या मानधनाबाबत काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु आज दसऱ्याच्या दिवशी होमगार्डच्या माध्यमातून दुप्पट वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1844970009388515563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1844970009388515563%7Ctwgr%5Ee443912addbe3bd8ee97e5ccb07874a03c5006d2%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fgood-news-for-maharashtra-homeguard-salary-almost-double-home-minister-devendra-fadnavis-announcement-ssd92

सरकारने केलेली ही वाढ 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करणार आहे. सुधारित भत्ते लागू करण्यासाठी 2024- 25 या वर्षाकरिता रुपये 552.7120 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास देखील मान्यता केलेली आहे. दरवर्षी 795.7120 कोटी रुपयांची तरतूद करण्यास देखील मान्यता दिलेली आहे.

राज्यातील होमगार्डचे (Homeguard Salary Hike) प्रतिदिन मानधन हे 570 रुपये एवढे होते. ते वाढून आता 1083 रुपये करण्यात आलेले आहे. आणि हे देशातील सर्वात जास्त मानधन आहे. तसेच इतर अनेक भत्त्यांमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचा उपहार भत्ता 100 रुपये होता. तो आता 200 रुपये करण्यात आलेला आहे. तसेच भोजन 100 रुपयावरून 250 रुपये एवढा करण्यात आलेला आहे.

सरकारने घेतलेले या निर्णयाचा जवळपास राज्यातील 55 हजार होम गार्डला याचा लाभ होणार आहे. सरकारने मागील महिन्यात सुमारे एक 11,2007 होमगार्ड ची भरती राबवली होती. आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची प्रशिक्षण करण्यात आलेले आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. आणि होमगार्डला दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.