Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होंडा मोटरसाइकिल एंड स्कूटर इंडियाने (Honda CB300F) आपल्या प्रीमियम उपकंपनी Honda BigWing India अंतर्गत देशात नवीन 300cc मोटरसायकल लाँच केली आहे . CB300F असं या दमदार बाईकचे नाव आहे . या बाईक एक्स-शोरूम किंमत 2.26 लाख आहे. या बाईकचे बुकिंग आता सुरू झाले आहे असून लवकरच डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया Honda CB300F ची खास वैशिष्ट्ये…

Honda CB300F

3 कलर ऑप्शन- (Honda CB300F)

Honda CB300F तीन रंगाच्या ऑप्शन मध्ये येते. मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड. नवीन होंडाला असिस्ट आणि स्लिपर क्लच, होंडाची सिलेक्टेबल ट्रॅक्शन कंट्रोल (HSTC) सिस्टम, स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम, सर्व-एलईडी लाइटिंग सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.नवीन Honda CB300F डिलक्स आणि डिलक्स प्रो या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यातील डीलक्स व्हेरिएंटची किंमत 2.26 लाख रुपये आहे, तर हाय-स्पेक डिलक्स प्रो ची किंमत 2.29 लाख रुपये आहे.

इंजिन-

इंजिन बाबत बोलायचं झालं तर, नवीन होंडा CB300F मध्ये 293cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. ही मोटर 24 Bhp पॉवर जनरेट करते आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडली गेली आहे . नवीन होंडा CB300F मध्ये सोनेरी रंगाचे USD फ्रंट फॉर्क्स आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक एब्जॉर्बर आहे. ब्रेकिंगसाठी, बाइकला स्टँडर्ड म्हणून ड्युअल चॅनल ABS सह समोर 276 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 mm डिस्क मिळते.

Honda CB300F

होंडाच्या या बाईकचा थेट सामना BMW G 310 R, KTM Duke 250, Bajaj Dominar 400 यांसारख्या बाइक्सशी होईल.