हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली नवीन स्कूटर Honda Scoopy लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि डिझाईन असलेली ही स्कुटर बघता क्षणीच लोकांना भुरळ घालेल. कंपनीने ही स्कूटर महिला आणि पुरुष दोघांनाही लक्षात घेऊन अतिशय स्टायलिश लूकमध्ये तयार केली आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिनसोबतच अनेक अॅडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत.
फीचर्स –
Honda Scoopy ला रेट्रो लूकसह लांब ओव्हल हेडलाइट मिळतात. यात LED DRL सह LED प्रोजेक्टर देखील मिळतो. याशिवाय, या स्कुटरची शीट थोडी मोठी असल्याने बसायला सुद्धा आरामदायी वाटते. Honda Scoopy ला 12 इंची अलॉय व्हील्स मिळतात. गाडीच्या सस्पेन्शन बाबत सांगायचं झाल्यास, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन आहे. ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम युनिटचा समावेश आहे.
इंजिन- Honda Scoopy
Honda च्या या स्कूटरला 110cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9bhp पॉवर आणि 9.3Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनची बोअर आणि स्ट्रोक व्हॅल्यू Honda Activa सारखीच आहे. होंडाची ही स्कूटर CVT गिअरबॉक्सशी जोडलेली असून तिला Honda Activa सारखीच स्मार्ट की देखील मिळते. स्कूपीचे वजन 95 किलोग्रॅम आहे आणि या स्कुटर ला 4.2 लीटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.
किंमत –
होंडाने ही स्कुटर सध्या इंडोनेशियामध्ये लाँच केली आहे. इंडोनेशियन बाजारात Honda Scoopy ची किंमत 2,16,53,00 इंडोनेशियन रुपये आहे म्हणजेच भारतीय चलनानुसार, 1.17 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. भारतीय बाजारात ही आकर्षक स्कुटर कधी लॉन्च केली जाईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.