हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Honda X-ADV 750। जपानी दुचाकी उत्पादक निर्माता कंपनी होंडा म्हणजे भारतीयांचा विश्वास… होंडाची गाडी म्हणजे भारतीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय… याच प्रेमामुळे कंपनी ऑटोमोबाईल बाजारात नेहमीच आघाडीवर पाहायला मिळते. ग्राहकांना पाहिजे अशी गाडी देणं हीच होंडाची खासियत, त्यामुळे आजही मार्केट मध्ये होंडाच्या गाड्यांचा खप मोठा आहे. आता कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नवी एडवेंचर स्कुटर लाँच केली आहे. अतिशय स्मार्ट लूक, दम्डर फीचर्स असलेली हि स्कुटर तरुणाईला वेड लावेल हे नक्की…. परंतु महत्वाची बाब म्हणजे या स्कुटरची किंमत ऐकूनच तुम्ही तोंडात बोटे घालाल. कारण या स्कुटरची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ११.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच काय तर या किमतीत तुम्ही २ कार सहज खरेदी करू शकता. अशावेळी या स्कुटर मध्ये नेमकं काय खास आहे जी हिला सर्वाधिक महागडी बनवते त्याचीच माहिती आज आपण अगदी सविस्तर जाणून घेऊयात.
745 cc इंजिन-
Honda X-ADV 750 मध्ये ७४५ cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ६,२५० rpm वर ५४ bhp पॉवर आणि ४,७५० rpm वर ६८ nm टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, जे आफ्रिका ट्विन बाईकसारखेच आहे. याचा अर्थ असा की त्यात बाईकसारखी शक्ती आणि स्कूटरसारखी सुविधा याचे कॉम्बिनेशन बघायला मिळतेय.
काय आहेत फीचर्स – Honda X-ADV 750
होंडाच्या या नवीन स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी हेडलाइट आणि डीआरएल, २२-लिटर स्टोरेज, टाइप सी यूएसबी चार्जिंग पोर्ट, पर्ल ग्लेअर व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक कलर ऑप्शन्स, ५-इंच टीएफटी डिस्प्ले, होंडा रोड सिंक अॅप, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, एसएमएस आणि कॉल अलर्ट, ४१ मिमी यूएसडी फोर्क्स, यासारखे अनेक फीचर्स आहेत. यात नकल गार्ड्स, ५-लेव्हल अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, स्पोक व्हील्स आणि ड्युअल-स्पोर्ट टायर्स आहेत. यासोबतच, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) देखील त्यात उपलब्ध आहे, जे रायडिंग दरम्यान चांगली पकड आणि सुरक्षितता देते.
किंमत किती?
होंडाने ही नवीन स्कूटर फक्त एकाच प्रकारात लाँच केली असून तिची एक्स-शोरूम किंमत ११.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला हि स्कुटर खरेदी करण्याची असेल तर त्यासाठी होंडाच्या प्रीमियम डीलरशिप होंडा बिगविंग द्वारे तुम्हाला बुक करावी लागेल. येत्या जून २०२५ पासून या स्कुटरची डिलिव्हरी सुरु होईल. ही स्कूटर भारतात फक्त दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये पर्ल ग्लेअर व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक रंगाचा समावेश आहे.




