हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने Honor 200 आणि 200 Pro हे दोन्ही स्मार्टफोन चिनी बाजारात लाँच केले आहेत. 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा, 16GB रॅम यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मोबाईल मध्ये देण्यात आले आहेत. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आला असला तरी लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.
Honor 200, 200 Pro चे फीचर्स –
Honor 200 आणि 200 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ रिझोल्यूशन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील Honor 200 Pro मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आलाय तर Honor 200 मध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आहे. हे दोन्ही मोबाल Android 14 वर आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. या दोन्ही मोबाईल मध्ये 1२ GB आणि 16GB रॅमचा पर्याय दिला आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor 200 Pro आणि Honor 200 च्या पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे तर 50-मेगापिक्सेल IMX856 टेलिफोटो कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोटो आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Honor 200 आणि 200 Pro ची किंमत
Honor 200 च्या 12/256GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,699 (अंदाजे 30,926 रुपये) आहे. तर 16/512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,199 (अंदाजे 36,749 रुपये) आहे. तर दुसरीकडे Honor 200 Pro ची किंमत 12/256GB व्हेरिएंटसाठी CNY 3,499 (अंदाजे 40,158 रुपये) आणि 16GB/1TB स्टोरेज प्रकारासाठी CNY 4,499 ($621) आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 31 मे पासून सुरू होणार आहे.