12GB रॅम, 50MP सेल्फी कॅमेरासह HONOR ने लाँच केले 2 नवे मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी HONOR ने भारतीय बाजारपेठेत HONOR 200 5G आणि HONOR 200 Pro 5G असे २ नवीन मोबाईल लाँच केलेले आहेत. या स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5200mAh बॅटरी सारखी अतिशय दमदार फीचर्स देण्यात आलेले आहेत. मोबाईल लूक सुद्धा दिसायला अगदी आकर्षक असून ग्राहकांना बघता क्षणीच या स्मार्टफोनची भुरळ पडेल. आज आपण या दोन्ही मोबाईलच्या किमती आणि स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

HONOR 200 चे फीचर्स

HONOR 200 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा OLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2664×1200 पिक्सेल रिझोल्युशन आणि 4000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टा कोअर प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MagicOS 8.0 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB/12GB रॅम आणि 256GB/512GB स्टोरेज पर्याय दिला आहे. कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, HONOR 200 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 50 मेगापिक्सेलचा टेलेफोटो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी असून हि बॅटरी 100W सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

HONOR 200 Pro चे फीचर्स

HONOR 200 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा OLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2700 × 1224 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 4000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर दिला असून हा मोबाईल सुद्धा Android 14 वर आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये फक्त 12GB रॅम 512GB स्टोरेज दिल आहे. मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 50 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. तर समोरील बाजूला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 100W सुपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

HONOR 200 Pro 5G च्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. तर HONOR 200 5G च्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon, ब्रँडची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर 20 जुलैपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.