Honor 200 Lite 5G : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honor या प्रसिद्ध ब्रँडचे मोबाईल ग्राहकांना चांगलेच पसंतीला उतरतात. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या गरजेनुसार अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल बाजारात लाँच करत असते. आताही Honor ने जागतिक बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor 200 Lite 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 GB रॅम यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.7 इंचाचा डिस्प्ले-

Honor 200 Lite 5G मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन मिळते. स्मार्टफोनला TUV Rhineland certification मिळालं असून मोबाईल वापरत असताना तुमच्या डोळ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कंपनीने या मोबाईल मध्ये डायमेंसिटी 6080 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन Android 14 आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. खास बाब म्हणजे या मोबाईल मध्ये तुम्हाला AI फीचर्स सुद्धा मिळतील.

कॅमेरा – Honor 200 Lite 5G

मोबाईलच्या कॅमेराबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. यामध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळतेय. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, Wi-Fi आणि ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत .

किंमत किती?

Honor 200 Lite 5G ची किंमत 329.90 युरो आहे. कंपनीने हा मोबाईल सध्या फ्रान्समध्ये लॉन्च केला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्टाररी ब्लू, सायन लेक आणि मिडनाईट ब्लॅक रंगात खरेदी करू शकतात.