हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर बहुप्रतीक्षित Honor Magic 6 Pro मोबाईल भारतीय बाजारात लाँच झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरु होती. आज कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 180MP झूम कॅमेरा,12GB रॅम आणि 5600mAh ची बॅटरी यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. कंपनीने या स्मार्टफोन काळा आणि हिरवा अशा २ रंगात आणला असून येत्या 15 ऑगस्टपासून Amazon आणि Honor च्या वेबसाइटवरून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता. चला या स्मार्टफोनबाबत संपूर्ण डिटेलस जाणून घेऊयात.
6.8 इंचाचा डिस्प्ले –
Honor Magic 6 Pro मध्ये 120hz रिफ्रेशरेटसह 6.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 5000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. यात डॉल्बी व्हिजन आणि ऑनरचे नॅनो क्रिस्टल शील्ड देखील आहे, ज्यामुळे मोबाईल पडला तरी मोबाईलला व्यवस्थित ठेवते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवला आहे. त्याअंतर्गत मोबाईलमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. खास बाब म्हणजे यामध्ये Adreno 750 ग्राफिक्स चिप देखील मिळतेय ज्यामुळे गेम खेळताना आणि विडिओ बघताना आनंद मिळतो. honar चा हा मोबाईल एंड्रॉइड 14 वर आधारित मैजिकओएस 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
कॅमेरा – Honor Magic 6 Pro
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor Magic 6 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि तिसरा 180-मेगापिक्सेल झूम कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5600mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80 वॉटच्या चार्जर आणि 66 वॅट्स वायरलेस चार्जरला सपोर्ट करते. Honor ने या स्मार्टफोनसाठी 4 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 5 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
किंमत किती?
Honor Magic 6 Pro फक्त 12GB + 512GB या एकाच स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला असून या मॉडेलची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ईपी ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 15 ऑगस्ट रोजी Amazon, मेनलाइन स्टोअर्स आणि Honor च्या ई-स्टोअरवर होईल.