हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Honor ने आपला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Honor Magic V Flip असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. होनरचा हा फोल्डेबल मोबाईल सध्या चिनी बाजारात लाँच झाला असून विवो आणि सॅमसंगच्या फोल्डेबल मोबाईलला तगडी फाईट देईल असं बोललं जातंय… आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
डिस्प्ले –
Honor Magic V Flip मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आलाय. तर यासोबत बाहेरील बाजूला 4 इंचाचा OLED एक्सटर्नल डिस्प्ले उपलब्ध आहे. हे दोन्ही डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतात. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित मॅजिक OS 8 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर ड्युअल सिम 5G, 4G, वायफाय, ब्लूटूथ असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
कॅमेरा – Honor Magic V Flip
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor Magic V Flip मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा + 12MP ड्युअल रियर कॅमेरा आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4800mAh बॅटरी बसवण्यात आली असुन ही बॅटरी 66W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
किंमत किती?
Honor Magic V Flip च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 4999 युआन (अंदाजे 57,595 रुपये ) आहे. तर त्याच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5499 युआन (अंदाजे 63,350 रुपये) आहे. 12GB RAM + 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5999 युआन (अंदाजे 69,110 रुपये) आणि 16GB RAM + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6999 युआन (अंदाजे 80,630 रुपये) आहे. हा मोबाईल काळ्या, पांढऱ्या आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे.