हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने जागतिक बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor X7b 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत . 108 मेगापिक्सेलचा अतिशय चांगल्या दर्जाचा कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीमुळे Honor चा हा स्मार्टफोन ग्राहकांच्या मनात भरेल यात शंका नाही. कंपनीने या मोबाईलची किंमत अजून जाहीर केली नसली तरी लवकरच ती जाहीर करण्यात येईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.8-इंचाचा डिस्प्ले –
Honor X7b 5G मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर वापरला असून हा स्मार्टफोन Android 13 OS या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. मोबाईल मध्ये 8GB ची दमदार रॅम देण्यात आली असून 256GB चे इंटर्नल स्टोरेज मिळतेय.
108MP कॅमेरा – Honor X7b 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor X7b 5G मध्ये 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2 MP सेकंडरी लेन्स आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईलच्या अन्य फिचर बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी-टाइप सी पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल स्पीकर यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. Honor चा हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, क्रिस्टल सिल्व्हर आणि एमराल्ड ग्रीन या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे.