Honor X9b : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Honor ने भारतीय बाजारपेठेत अतिशय मजबूत असा मोबाईल लाँच केला आहे. Honor X9b असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल “अँटी-ड्रॉप डिस्प्ले” च्या USP सह येतो. म्हणजे फोन पडला तर अजिबात तुटणार नाही.मोबाईलची खास गोष्ट म्हणजे कंपनीने यामध्ये मजबूत असा कर्व्ड डिस्प्ले दिला असून जो 3 लेयर स्क्रीन प्रोटेक्शनसह उपलब्ध आहे. याशिवाय या मोबाईल मध्ये 108MP कॅमेरासह अजूनही काही दमदार फीचर्स मिळतात. कव्हळा तर त्याबाबत जाणून घेऊयात…
काय आहेत फीचर्स – Honor X9b
Honor X9B मध्ये कंपनीने 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येत असून त्याची पीक ब्राइटनेस 1200 nits इतकी आहे. या मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेट बसवण्यात आली असून हा Honor चा हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित MagicOS 7.2 UI वर चालतो. पॉवर साठी मोबाईल मध्ये 5800mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor X9B मध्ये 108MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
किंमत किती?
Honor X9B हा मोबाईल 8GB RAM सह लाँच झाला असून भारतात त्याची किंमत 25,999 रुपयांपासून सुरु होतेय. 16 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची पहिली विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हा मोबाईल सनराइज ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. त्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazonला तुम्हाला भेट द्यावी लागेल.