Honor X9c 5G : Honor ने लाँच केला 108MP कॅमेरावाला मोबाईल; किंमत किती पहा

Honor X9c 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने भारतीय मार्केट मध्ये 108MP कॅमेरावाला नवीन मोबाईल लाँच केला आहे. जर तुम्ही स्टायलिश, हलकाफुलका मोबाईल खरेदी करणार असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. Honor X9c 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. १२ जुलैपासून तुम्ही प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून हा नवा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तत्पूर्वी या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आपण जाणून घेऊयात….

डिस्प्ले-

Honor X9c 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट सह ६.७८-इंचाचा कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेला 3840Hz PWM डिमिंग आणि लो ब्लू लाईट + फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन देखील आहे, ज्यामुळे मोबाईल वापरताना तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कंपनीने मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन ६ जनरल १ चिपसेट वापरली असून Honor चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५-आधारित MagicOS ९.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. खास बाब म्हणजे या स्मार्टफोन मध्ये AI आधारित फीचर्स सुद्धा देण्यात आली आहेत. AI मोशन सेन्सिंग, AI इरेज, AI डीपफेक डिटेक्शन, AI मॅजिक पोर्टल २.० आणि AI मॅजिक कॅप्सूल सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन IP65M रेटिंग सह येतो ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका राहत नाही.

कॅमेरा – Honor X9c 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Honor X9c 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह १०८-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर सेन्सर आणि ५-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल लेन्स कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला १६-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6,600mAh दमदार बॅटरी आहे. हि बॅटरी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर हा स्मार्टफोन 25.8 तासांचा व्हिडिओ किंवा 48.4 तासांचा ऑनलाइन म्युझिक प्लेबॅक देऊ शकत.

किंमत किती?

आता येउयात महत्वाच्या मुद्द्यावर, ती म्हणजे मोबाईलची किंमत. तर भारतात, Honor X9c 5G फक्त एकाच स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला आहे, तो म्हणजे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज… त्यानुसार या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हॉनरचा हा मोबाईल जेड सायन आणि टायटॅनियम ब्लॅक शेड्समध्ये लाँच करण्यात आला असून येत्या 12 जुलैपासून Amazon वर उपलब्ध असेल.