संतापजनक ! दुसऱ्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील बासवाडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीला झाडाला बांधून जबर मारहाण (severely beaten wife) केली आहे. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल. यामध्ये पीडित महिलेने (severely beaten wife) एका पुरुष मित्राकडून लिफ्ट घेतल्यामुळे नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला असे झाडाला बांधून मारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणात नराधम पतीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना बांसवाडाच्या घाटोल सर्कल या ठिकाणी घडली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत (severely beaten wife) असल्याचे स्प्ष्टपणे दिसत आहे. हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. रात्री सुमारे दोनच्या सुमारास या पती-पत्नीला शोधून काढण्यात आले. यानंतर पीडित महिलेने रात्री एफआयआर दाखल केली.

काय घडले नेमके ?

पीडित महिलेची सासूरवाडी हेरो गावात आहे. ही महिला काही कामानिमित्ताने शुक्रवारी घाटोल बाजारात गेली होती. याच दरम्यान तिला तिचा मित्र देवीलाल मईडा भेटला. महिलेने देवीलालला मावस सासूच्या घरी मुडासेलला सोडण्याची विनंती केली. महिला आणि देवीलाल हे मावस सासूच्या घरी पोहचले. यावेळी मावस सासू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संशयाच्या आधारावर या दोघांना बंदी केले. यानंतर या महिलेच्या पतीला याची माहिती देण्यात अली. यानंतर आरोपी पती, महावीर, दीर कमलेश, भावजय सुंका आणि मामे सासऱ्यांनी या दोघांना दांडक्यांनी आणि बुटांनी मारहाण (severely beaten wife) केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.