हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Horrible Video) आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय आहे. सोशल मीडिया जणू आधुनिक काळाची गरज झाली आहे. या माध्यमातून अनेक लोक विविध रिल्स शेअर करून इतरांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. कधी स्टंटबाजी, कधी भन्नाट डान्स तर कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला रिल्समधून पहायला मिळतात. अनेकदा काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की, आपण स्वप्नातही विचार केला नसेल. असाच एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक मैल भररस्त्यात एक पूजा मांडून बसली आहे. जिला पाहून अनेकांनी ती जादूटोणा करत असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
भररस्त्यात महिला करत होती अघोरी पूजा (Horrible Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नीट पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, महिला भरधाव धावणाऱ्या गाड्यांच्या मध्ये रस्त्यात बसून काहीतरी पूजा मांडते आहे. यामध्ये दिसतंय की, या महिलेने रस्त्याच्या मधोमध तीन ठिकाणी आग लावली आहे. शिवाय नारळ आणि इतर काही सामानासह तिने एक रिंगण आखून पूजा मांडली आहे. जी काही सामान्य वाटत नाहीये. आसपासचे वाटसरू तिच्याकडे पाहत आहेत. मात्र, तिला कुणाचीही फिकर नसून ती आपल्या कामात व्यग्र दिसतेय.
खरंतर, ही महिला इथे नेमकं काय करतेय? हे काही पक्के सांगता येणार नाही. शिवाय हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे? कोणत्या रस्त्यावरील आहे? ती महिला कोण आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. (Horrible Video) अनेकांनी हा व्हिडीओ पहिल्यानंतर ही पूजा आहे की जादूटोणा? असा सवाल उपस्थित केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र, ‘या महिलेचे कृत्य अघोरी असून ती जे करतेय त्याला काला जादू म्हणतात’, असा दावा केला आहे. मात्र, हॅलो महाराष्ट्र याविषयी कोणताही दावा करत नाही.
भीतीचे वातावरण
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून शेअर केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डलवर PalsSkit नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Horrible Video) या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ताईने पूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे’. तर अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट शेअर केल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘ही पूजा आहे? जादूटोणा? की आणखी काही?’ तर अन्य एकाने म्हटलंय, ‘ही बाई काला जादु करतेय.. कुणीतरी थांबवा हिला’. तसेच आणखी एकाने म्हटले, ‘कुणीही असं भररस्त्यात काहीही कसं करू शकत? सरकारच लक्ष का नाहीये?’
(हॅलो महाराष्ट्र अंधश्रद्धेशी संबंधित कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही)