औरंगाबाद | सव्वा लाख रुपये बिलासाठी एका रुग्णाचा मृतदेह आडवून ठेवणाऱ्या बजाज नगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटल येथील केअर सेंटरची मान्यता रद्द
करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिले आहेत.
सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचे उपचार पूर्ण करून त्यांना सुट्टी द्यावी तसेच 25 मे नंतर एकही रुग्णास दाखल करू नये असे लेखी आदेश रुग्णालयाला देण्यात आले आहे. सोमवारी एका रुग्णाचा बिल न भरल्या कारणाने डॉक्टरांनी मृतदेह देण्यास नकार दिल्यानंतर बराच काळ गोंधळ झाला होता. अखेर 40 हजारात तडजोड केल्यानंतर मृतदेह नातलगांना देण्यात आला.
या नंतर रुग्ण न्याय हक्क परिषदेने या रुग्णालयाची जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली .कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक परवानगी न घेता हे रुग्णालय चालू आहे. तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याची तक्रारीत नमूद केल्या होते. दरम्यान, डॉ. जी. एम .कुंडलीकिंकर, डॉ. विजयकुमार वाघ ,डॉ. प्रशांत दाते, डॉ. बामणे यांनी या आरोपींची चौकशी करून अहवाल दिला यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने केअर सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली आहे .