Hostel Student Allowance : वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; आता ‘इतके’ रुपये मिळणार

Hostel Student Allowance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hostel Student Allowance । आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये सरकार कडून वाढ करण्यात आली आहे. यामध्ये निर्वाह भत्ता, साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता यांसारख्या भत्त्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. अदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली.

डॉ. अशोक वुईके म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावी राहून उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे, याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. सध्या एकूण 490 वसतिगृहे कार्यान्वित आहेत. या वसतिगृहांमध्ये इयत्ता 8 वी पासून पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास भत्ता, वेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके इ. साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता याकरिता एकरकमी रक्कम (Hostel Student Allowance) विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. दि २४ जून २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेनुसार आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना दरवाढ करण्यात येत आहे.

भत्त्यात किती रुपयांची वाढ- Hostel Student Allowance

निवास भत्ता – विभागीय स्तरावरील वसतिगृहांसाठी दर महिन्याचा निवास भत्ता 800 रुपये असून सुधारित भत्ता 1500 करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी 600 ऐवजी 1300, तर तालुकास्तरावरील वसतिगृहांसाठी 500 ऐवजी 1000 रुपये निवासी भत्त्यात दरवाढ करण्यात आली आहे. सध्या मुलींना 100 रुपये अतिरिक्त निर्वाह भत्ता देण्यात येतो, ज्यामध्ये आता वाढ करून तो 150 रुपये इतका करण्यात येत आहे. Hostel Student Allowance

बेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके व इतर साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) — इ. 8 वी ते 10 वी साठी सध्याचा भत्ता 3200 रुपये आहे, मात्र आता सरकार कडून या भत्त्यात भरगोस वाढ करण्यात आली असून हाच भत्ता आता 4500 रुपये करण्यात आला आहे. 11वी, 12वी व पदविका अभ्यासक्रमासाठी 4000 ऐवजी 5000 रुपये, पदवी अभ्यासक्रमासाठी 4500 ऐवजी 5700 रुपये, तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 6000 ऐवजी 8000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

आहार भत्ता (दरमहिना) — “अ”, “ब” आणि “क'” वर्गातील महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहांमध्ये सध्याचा आहार भत्ता 3500 असून तो 5000 रुपये करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी 3000 ऐवजी 4500 इतकी वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.