House Rent Rule: हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! भाडे न देणाऱ्या तुमच्या भाडेकरू सोबत वाद घालू नका. आजच्या लेखात आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे वाद न घालता तुम्हाला तुमच्या घराचे भाडे मिळून जाईल. चला तर मग जाणून घेऊया…
भाडे करार
सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेंट ऍग्रिमेंट. या महत्वाच्या करारात स्वतः भाड्याची रक्कम, देय तारीख आणि न भरण्याचे परिणाम समाविष्ट आहेत का ? हे तपासून पहा. हा दस्तऐवज जमीन मालकाने केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईचा (House Rent Rule) आधार असतो. काळजीपूर्वक करार करा आणि सर्व अटी स्पष्टपणे करारात नमूद करा.
नोटीस द्या (House Rent Rule)
भाडेकरू ठरवलेल्या वेळेमध्ये घर भाडे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर रेंट एग्रीमेंट नुसार घर मालक भाडेकरू बरोबर कायदेशीर कारवाई करू शकतो. यासाठी घरमालक भाडेकरूच्या विरुद्ध इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872 अंतर्गत कायदेशीर (House Rent Rule) नोटीस पाठवू शकतो.
न्यायालयात खटला दाखल करा
कायदेशीर नोटीस पाठवूनही भाडेकरू भाडे देण्याचे नाव घेत नसेल तर सरळ घर मालक कोर्टामध्ये खटला दाखल करू शकतो. यामध्ये जर भाड्याची रक्कम कमी असेल तर हा खटला सिव्हिल कोर्ट मध्ये दाखल केला जातो. मात्र भाड्याची रक्कम जास्त वेळ थकीत आणि मोठी असेल तर खटला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टामध्ये देखील दाखल केला जाऊ शकतो. अशावेळी कोर्टामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि जर का पुरावे हे भाडेकरूच्या विरोधात असतील तर निकाल हा घर मार्गाच्या बाजूला लागतो.
डिपॉझिट घ्यायला विसरू नका (House Rent Rule)
घर मालक आपले घर हे भाडेकरूच्या हातात देतो तेव्हा सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट पोटी काही रक्कम घेत असतो. समजा अशा परिस्थितीमध्ये भाडे करूने भाडे दिले नाहीत किंवा भाडेच द्यायचं नाही म्हंटले तर घर मालक भाडेकरूने दिलेल्या डिपॉझिट मधून घर भाड्याची रक्कम वजा करू शकतो.
निष्कासन कार्यवाही (House Rent Rule)
भाडेकरू सातत्याने भाडे भरत नसल्यास , तुम्ही बेदखल कारवाई देखील सुरू करू शकता. भारतातील (House Rent Rule) बेदखल कायदे राज्यानुसार बदलतात. तुमच्या मालमत्तेतून भाडेकरूला बेदखल करण्यासाठी बेदखल केस दाखल करण्यापूर्वी, चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या.