महाराष्ट्रात मागील 15 महिन्यात 3500 शेतकऱ्यांची आत्महत्या; सरकारी आकडेवारीत खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात 75 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु आजकाल शेतीमधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत नाही. दुष्काळ, नापीक अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला लागत असतो. त्यामुळे शेतकरी देखील हतबल झालेले आहे. शेतीमध्ये धान्य पिकले नाही, तर त्यांना कोणताही आर्थिक फायदा होत नाही. आणि कुटुंब कसे चालवायचे? हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो. अशातच हाती आलेले माहितीनुसार राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2023 ते 24 या काळात जवळपास 1370 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील

जानेवारी 2023 ते मार्च 2024 या दीड वर्षांमध्ये जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे दररोज राज्यामध्ये सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी भीषण परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.

याच्यामध्ये अमरावती जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला आणि दुष्काळ जाहीर झाल्यापासून जवळपास 1370 शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याची आकडेवारी समोर आलेली आहे.

या 11 जिल्ह्यात आत्महत्यांची जास्त नोंद

1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2024 या काळामध्ये जळगाव या जिल्ह्यामध्ये 149 शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली. धाराशिवमध्ये 207 शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंदणीमध्ये 113 नांदेडमध्ये 212, बीडमध्ये 314, अमरावतीमध्ये 406, अकोलामध्ये 193, यवतमाळमध्ये 388, बुलढाणामध्ये 350, वर्धामध्ये 143, चंद्रपूरमध्ये 150, छत्रपती संभाजीनगरमध्ये 126 इत्यादी शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.