How Many Gold Available On Earth | भाऊ पृथ्वीवर किती सोनं शिल्लक राहिलयं? अन् कोणत्या देशाकडं सर्वाधिक आहे?

How Many Gold Available On Earth
How Many Gold Available On Earth
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील लोकांना सोन्याचे खूप आकर्षण असते. भारतामध्ये सोन्याचे दागिने सर्वाधिक प्रमाणात घातले जातात. त्याचप्रमाणे सोने हे जगातील मौल्यवान धातूंपैकी एक धातू आहे. सोन्याच्या किमती आज-काल वाढत चाललेल्या आहेत. अनेक लोक गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे घरात देखील अनेक सोन्याच्या वस्तू बनवून घेतात. अगदी दुबईमध्ये तर काही लोकांनी सोन्याच्या गाड्या देखील घेतलेल्या आहेत. सोन्याच्या अनेक खाणी देखील आहेत आणि त्या खाणींमधून सोने काढले जाते त्यापासून सोन्याचे दागिने आणि विविध गोष्टी तयार केल्या जातात. आतापर्यंत खाणकामातून पृथ्वीवरून तब्बल 1, 90,000टन सोने काढले आहे. आणि यानंतर आता पृथ्वीवर किती सोने शिल्लक आहे (How Many Gold Available On Earth) हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आपण आपल्या लेखातून पृथ्वीवर सध्या किती सोने शिल्लक राहिलेले आहे हे पाहणार आहोत.

पृथ्वीवर किती सोने उपलब्ध ? | How Many Gold Available On Earth

आतापर्यंत 1,90,000 सोन्याचे तुकडे पृथ्वीवर उत्खनन करून काढण्यात आलेले आहेत. पृथ्वीच्या भूगर्भात अनेक सोन्याच्या खाणी आहेत. केलेल्या संशोधनानुसार असे समोर आलेले आहे की, पृथ्वीवर सध्या एकूण 50 हजार टन सोन्याचा साठा उपलब्ध आहे. जो खाणकामातून काढता येणार आहे.

कोणत्या देशाच्या सरकारकडे जास्त सोने आहे?

अनेकवेळा आपण पाहिलेले आहे की, काही देशात सोन्याच्या किमती कमी असतात. तर काही देशात सोन्याच्या किमती जास्त असतात. या किमती त्या देशात किती सोने उपलब्ध आहे यावर अवलंबून असतात. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की, कोणत्या देशात सर्वात जास्त सोने आहे? आत्तापर्यंत हाती आलेल्या संशोधनात अमेरिका या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे अमेरिकेकडे 8133. 46 टन सोन्याचा फाटा शिल्लक आहे त्याचप्रमाणे दोन नंबरवर जर्मनी आहे. जर्मनीमध्ये 3352.85 टन सोने शिल्लक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आपल्या भारतात सोन्याला जास्त मागणी आहे तर भारतात नक्की किती सोने शिल्लक आहे.

भारतात किती सोने शिल्लक आहे | How Many Gold Available On Earth

भारतात 803.58 टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याच्या यादीत भारत हा नवव्या क्रमांकावर येतो. सोन्याची वाढती मागणी लक्षात घेता सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

सगळ्यात स्वस्त सोने कुठे मिळते?

तुम्हाला जर जगातील सर्वात स्वस्त सोने खरेदी करायची असेल, तर तुम्हाला हॉंगकॉंगला जावे लागेल. हॉंगकॉंगमध्ये सोन्याचे दर खूप कमी आहेत. परंतु भारतीय चलनाशी तुलना केल्यास त्यात जास्त फरक दिसत नाही.