तुमच्या आधार कार्डवरून किती जणांनी SIM कार्ड घेतलयं; एका मिनिटात करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वच बाबतीत स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आधारकार्ड हे एक महत्वाचा पुरावा म्हणून उपयोगात आणला जातो . आपल्या आधारकार्डचा वापर करून आपण विविध प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकतो. सध्या मोबाईल मधील सिम कार्ड घेण्यासाठी सुद्धा आधार कार्डच बघितलं जाते. सिमकार्ड साठी आधार कार्ड सक्तीचे असले तरी मोठ्या प्रमाणात आधार कार्डचा गैर वापर करून अनधिकृतपणे सिमकार्ड खरेदी करण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. तरी आजच्या ह्या बातमीच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या अनधिकृत सिमकार्डची यादी जाणून घेऊ शकता.

भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाने अधोरेखित केलेल्या नियमांनुसार, एका आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात, परंतु हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. अशा परिस्थितीत अनधिकृतपणे अनेकांनी सिमकार्डही घेतले आहे. मात्र याबाबत आधार मुख्य आधारकार्डधारकाला ह्याची माहिती नसते . तुमच्याही आधारकार्डवर एकूण किती सिम कार्ड सुरु आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका पोर्टलवर ते कसे तपासता येतील हे सांगणार आहे.

सध्या भारतात सिमकार्डची अनधिकृत होणारी खरेदी हि वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कार्डधारक आणि सरकार यांमधील दोघांनाही अडचणी उदभवू शकतात याबाबत, सरकारी दूरसंचार विभागाकडून एक (DoT) वेबसाइट प्रस्थापित करण्यात आली आहे. सरकारने tafcop.dgtelecom.gov.in ह्या पोर्टलवर सदर माहिती उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाईटद्वारे, कोणीही आपल्या आधार कार्डवर किती सिम कार्ड खरेदी केले गेले आहेत हे तपासू शकता . येथे तुम्हाला तुमच्या नावे असलेल्या सिम कार्डची यादी समोर येईल. तसेच त्या यादीत असलेली अनधिकृत सिम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती देखील करू शकता .

लिंक केलेला सिम नंबर कसा तपासायचा

सर्वप्रथम तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला या वेबसाइटवर दिलेल्या कॉलम मध्ये तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.

आता मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

OTP टाकल्यानंतर तुम्हाला Action चा पर्याय मिळेल.

या बटणावर क्लिक केल्यावर ते सर्व क्रमांक तुमच्या समोर येतील जे तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जातील.

त्या नंबर वर जर बेकायदेशीर नंबर आढळला तर तो तुम्ही ब्लॉक देखील करू शकता .