दुबईहून भारतामध्ये किती सोने आणता येते?? यासाठी कोणता कर भरावा लागतो का?? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला भारतामध्ये सोन्या -चांदीच्या भावात (Gold Price Today) लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. यामुळे सोने खरेदी करणेच सर्वसामान्यांना परवडण्याचा बाहेर गेले आहे. भारतात सोन्या चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी दुबईमध्ये सोनं स्वस्त दरात खरेदी करता येत आहे. ज्यामुळे अनेकजण भारतात सोने खरेदी करण्याऐवजी दुबई मधूनच होणे खरेदी करत आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही दुबईमध्ये सोने (Dubai Gold) खरेदी केले तरी ते भारतात किती आणू शकतो. तसेच दुबई मधले सोने भारतात आल्यानंतर कोणती कारवाई केली जाऊ शकते का?? जाणून घ्या या प्रश्नाची उत्तरे

भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त

दुबईला सोन्याचे शहराचे म्हटले जाते. त्यामुळेच भारतातील अनेक लोक दुबईला भेट देण्यासाठी जातात आणि तेथून परत येताना सोन्याचे दागिने, सोन्याच्या वस्तू घेऊन येतात. कारण भारतापेक्षा दुबईमध्ये सोने अधिक स्वस्त मिळते हा विश्वास लोकांचा आहे. खरे तर, ही बाब सत्य आहे की दुबईमध्ये भारतापेक्षा स्वस्त दरात सोने मिळते. हे आयात शुल्कामुळे स्वस्त बसते. भारतात सोने आयात करण्यासाठी शुल्क भरावे लागते, परंतु दुबईला हे आयात शुल्क भरावे लागत नाही. त्यामुळे दुबईमध्ये सोने भारतापेक्षा स्वस्त मिळते.

या कारणामुळे जेव्हा जेव्हा कोणता नातेवाईक किंवा मित्र दुबईला जातो त्यावेळी भारतातील लोक त्या व्यक्तींना सोने आणण्यासाठी सांगतात. परंतु दुबईवरून सोने आणताना काही नियमही पाळावे लागतात. सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर दुबईमध्ये सोन्याची किंमत 263.25 प्रति ग्रॅम सुरु आहे. जी भारतीय चलनात 5969 रुपये मोडते. भारतात 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये आहे. ज्यामुळे हे लक्षात येते की भारतापेक्षा दुबईमध्ये सोने किती पटीने स्वस्त आहे.

दुबईहून भारतात किती सोने आणता येते??

परंतु लक्षात घ्या की एक वर्षापेक्षा अरे काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय व्यक्तीला 50000 रुपये किमतीचे 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने कोणत्याही शुल्का व्यतिरिक्त भारतात आणता येतात. तसेच, 40 ग्रॅमपर्यंतचे 1,00,000 रुपये किंमतीचे दागिने आणण्याची परवानगी भारतीय व्यक्तीला असते. परंतु एखाद्या भारतीय प्रवाशाने मर्यादेपेक्षा अधिक सोने खरेदी केल्यास हे सोने भारतात आणण्यासाठी त्याला सीमा शुल्क भरावे लागते. कोणताही भारतीय व्यक्ती सोन्याची नाणी, बार किंवा बिस्किटे घेऊन भारतात येऊ शकत नाही.