लोकसभेच्या निवडणुकीसाठी किती पैसा खर्च होतो? आणि तो कोण करतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. खरे तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणुका घेण्यात येतात. या निवडणुकासाठी आयोग कोट्यावधी रुपये खर्च करते. आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने 10.5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र आताच्या घडीला या आकड्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

कारण की, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यामध्ये उमेदवारांनी नेमका किती खर्च करावा हे आयोगाने निश्चित केले असले तरी पक्षासाठी अशी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकांच्या काळात सर्वाधिक पैसा खर्च होतो. महत्वाचे म्हणजे, दरवर्षी निवडणुकीसाठी खर्चण्यात येणाऱ्या पैशांमध्ये वाढ होत जाते. म्हणजेच गेल्या निवडणुकीपेक्षा यांनाच्या निवडणुकीमध्ये अधिक पैसा खर्च होऊ शकतो.

याबाबतच सेंटर फॉर मीडिया स्टडिजने काढलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा निवडणुकीसाठी खर्च केल्या जाऊ शकतो. असे झाल्यास यंदाची लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल. कारण यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर त्यापूर्वीच्या म्हणजेच 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत 30 हजार कोटी रुपये खर्च केले गेले होते. ही आकडेवारी नीट पाहिला गेला तर लक्षात येते की प्रत्येक वर्षी खर्चाचे आकडे वाढत झालेले आहेत.

निवडणुकीसाठी खर्च कोण करते?

महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक निवडणुका घेत असताना त्याला संपूर्ण खर्च सरकारकडून केला जातो. परंतु लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च केंद्र सरकार करत असते. तर विधानसभा निवडणुकीचा खर्च राज्य सरकार करते. यामध्ये चुकून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तर खर्च राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विभागला जातो. आता सध्याच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे या निवडणुकांसाठी किती खर्च करण्यात होईल, याबाबत फक्त अंदाज बांधले जात आहेत.