किती Speed वर गाडी चालवल्यावर मिळते जास्त Mileage? घ्या संपूर्ण ज्ञान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी चालवताना तिचे स्पीड आणि ती किती मायलेज देते या २ गोष्टी आपण बघत असतो. गाडी किती मायलेज देते यावरूनच कळत कि तुम्हाला ती आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे कि नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु कारचे स्पीड आणि मायलेज यांचा एकमेकांशी मोठा संबंध आहे. काही लोकांना वाटतं कि गाडी हळू हळू चालवल्यानंतर जास्त मायलेज देईल, तर काहींना वाटत कि कार फास्ट मध्ये चालवली तर जास्त मायलेज मिळेल. परंतु हे दोन्हीही समज पूर्णपणे चुकीचे आहेत. कार चालवत असताना आपण कोणत्या स्पीड वर कोणता गिअर टाकला आहे हे महत्त्वाचं असत, यावरच तुमची गाडी जास्त मायलेज देईल कि कमी हे सुद्धा ठरत.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही 70-100 kmpl या स्पीडने कार चालवता त्यावेळी सर्वोत्तम मायलेज मिळू शकेल. या वेगाने कार टॉप गिअरमध्ये चालवणे आवश्यक आहे. पण शक्यतो हायवेवरच ते शक्य होईल. खराब रस्त्यावरून या स्पीडने कार चालवणं शक्य नाही. शहरात सुद्धा अनेकदा ट्राफिक मुळे कमी स्पीड मध्ये कार चालवावी लागते. आजकाल प्रत्येक कारमध्ये स्पीडोमीटरसह RPM मीटर असते. इंजिनवर किती लोड आहे हे RPM मीटरवर समजते. अशावेळी कोणत्याही गिअरमध्ये तुम्ही कार चालवत असला तरी तिचा RPM 1500 ते 2000 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.

आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल कि कारचे स्पीड कमी असल्यावर मायलेज कस काय कमी पडत? तर त्याचे उत्तरही आम्ही तुम्हाला सांगतो. जर तुम्ही हाय गिअर मध्ये कमी वेगात कार चालवली तर गाडीच्या इंजिनवर त्याचा लोड येतो आणि गाडीमधील इंधन मोठ्या प्रमाणात खर्च होते. साहजिकच गाडी कमी मायलेज देते. त्यामुळे योग्य गियर मध्ये योग्य स्पीड मध्ये गाडी चालवावी.