हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सर्वसामान्य लोकांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लोकांच्या अपेक्षा खूप जास्त वाढलेले आहेत. परंतु त्यांच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे एका वेळी जास्त रक्कम नसते. त्यामुळे अनेक लोक कर्जाचा पर्याय निवडतात परंतु जेव्हा कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देते. त्यावेळी त्यांच्या अनेक अटी आणि शर्ती तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. जर तुम्ही त्या अटींचे पालन केले, तरच तुमचे कर्ज मंजूर केले जाते. कर्ज घेताना सगळ्यात आधी तुमचा बँकेच्या सिबील स्कोर चेक करतात. तुमची क्रेडिट हिस्ट्री देखील तपासली जाते. जर तुमचा हा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुमचा अर्ज मंजूर केला जातो. जर तुम्ही अगोदर घेतलेले कर्ज व्यवस्थित फेडले नसेल, किंवा ईएमआय थकले असतील तर त्याचा परिणाम तुमच्या सीबील स्कोरवर होतो.आणि तुमचा सीबील खराब होतो. सिबिल स्कोर खराब असल्याने बँका तुम्हाला कर्ज देत नाही. परंतु जर तुमचा सीबील स्कोर खराब झाला असेल, तर तो कशा पद्धतीने नीट करावा? यासाठी किती वेळ लागतो? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सिबिल स्कोर का खराब होतो ?
खराब होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे जर तुम्ही एखाद्या कर्ज घेतले असतील आणि त्याचे ईएमआय वेळेवर भरलेले नसतील, तसेच त्या कर्जाचे सेटलमेंट केले असेल, तर तुमचा सिबील स्कोर खराब होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, आणि पेमेंट जर वेळेवर भरले नसेल, तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही संयुक्त कर्ज घेतले असेल, किंवा एखाद्याच्या कर्जाला गॅरेंटर असाल, त्या व्यक्तीने जर कर्ज भरले नसेल, तरी त्याचा वाईट परिणाम तुमच्या सिबील स्कोरवर होतो.
सिबिल स्कोर कसा सुधारायचा?
तुम्हाला जर तुमच्या सीबील स्कोरची काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात आधी मोठ्या स्वरूपाचे कर्ज घेऊ नका. जर कर्ज घेतले, तर त्याचे ईएमआय ळेवर भरा. तुम्ही क्रेडिट कार्डवर 30% पेक्षा जास्त खर्च करू नका. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्याच्या कर्जासाठी गॅरेंटर व्हायचे असेल, तर संपूर्ण विचार करून निर्णय घ्या. अन्यथा याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो.
सिबिल स्कोर नीट करण्यासाठी किती वेळ कालावधी लागतो
जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर तो एका दिवसात नीट होत नाही. यासाठी जवळपास कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. तसेच यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो.