मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करावा? लागतात ‘ही’ महत्वाची कागदपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार हे राज्यातील सगळ्या घटकांचा विचार करून विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ल. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असे आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक सहभाग घेऊ शकतात. ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि वयोमानानुसार अनेक अडचणी येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आह यामध्ये मनुष्य केंद्र, उपचार केंद्र, मानसिक स्वास्थ्य प्रबोधन यांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार साधने आणि उपकरणे खरेदी करता येणार आहे. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, विंचर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांसारख्या गोष्टी खरेदी करता येणार आहे. यासाठी सरकारकडून 100% आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध आहेत.

योजनेत सहभाग घेण्यासाठी निकष

31 डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत उमेदवाराचे 65 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असला तरी चालेल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे. यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे त्याच्या आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र यांसारख्या कागदपत्रांची गरज आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.