हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे आता भारतामध्ये पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी देण्यात आलेली आहे. भारत आता या प्रोजेक्टसाठी जवळपास 1435 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती देखील आलेली आहे. परंतु आता जे पॅनकार्ड धारक आहेत. त्यांच्या मनात पॅनकार्ड बद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता करदात्यांना नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड तयार करावे लागणार आहे. परंतु हे नवीन कार्ड बनवताना आधीच्या कार्डचे काय करावे? की दोन्ही कार्ड गरजेचे आहेत का? यांसारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सरकारचा पॅन कार्ड 2.0 प्रकल्प नक्की काय आहे ?
सरकारचा हा पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट पॅन कार्डचे नवीन अपडेटेड व्हर्जन आहे. यावेळी पॅन कार्डला एक क्यूआर कोड असणार आहे. करदात्यांना तो क्यूआर कोड बनवण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. तसेच कुठे जाण्याची देखील गरज लागणार नाही. तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कोणतेही पैसे न भरता हे पॅन कार्ड तयार करून घेऊ शकता.
पॅन कार्ड 2.0 उद्दिष्ट काय आहे?
करदात्यांना त्यांची नोंदणी आणि सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने होणार आहेत. तसेच सर्व माहिती एकाच ठिकाणावर सहज उपलब्ध व्हावी. तसेच हे काम पर्यावरणपूरक प्रक्रियेद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे याला कमी खर्च देखील लागणार आहे. यामध्ये तुम्हाला चांगली सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना ऑनलाइन पद्धतीने हे पॅन कार्ड काढले तर त्यांना खूप जास्त फायदा होईल.