How to Check Fake Saffron | केसर हा अत्यंत महागडा पदार्थ आहे. तरी देखील बाजारामध्ये प्रत्येक सीझनला केसरला खूप मोठी मागणी असते. केसरचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये देखील केला जातो. त्याचप्रमाणे अनेक खाद्यपदार्थांमध्ये देखील केशरचा वापर केला जातो. हे केशर खूप महाग असते. त्यामुळे ग्राहकांची अनेक वेळा फसवणूक केली जाते. ग्राहकांना नकली केसर दिले जातात. बाजारामध्ये सध्या मसाल्याच्या पदार्थांपेक्षा केसरची किंमत देखील जास्त आहे.
अनेक पदार्थांमध्ये केसरचा (How to Check Fake Saffron ) वापर केला जातो. खास करून गोड पदार्थ बनवताना केसर वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे मिठाईला रंग आणण्यासाठी केसाचा वापर केला जातो. केशरमध्ये ए जीवनसत्व, फॉलिक ऍसिड, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम यांसारखे इतर अनेक घटक असतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.
अनेक लोक चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्यासाठी देखील दुधामध्ये केशर टाकून पितात. जम्मू काश्मीरमध्ये केशरची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु बाजारात आजकाल सगळे केसर हे असली केसर नसतात. लोकांची अनेकवेळा फसवणूक होत असते. त्यामुळे बाजारात नकली केसर कसे ओळखायचे हे आपण जाणून घेणार आहोत.
केसरची चव ओळख तपासा | How to Check Fake Saffron
बाजारातून केसर विकत घेण्यापूर्वी त्याची चव घेऊन पहावी. त्यामुळे खरे आहे की खोटे हे समजते. केसर ओळखण्यासाठी केसरची एक काडी घेऊन पंधरा ते वीस मिनिटात तोंडामध्ये ठेवावी. ते खरे केसर असेल उष्णता जाणवू लागेल. पण नकली केसर असल्यावर असे जाणवत नाही. खरे केसर जिभेवर ठेवल्यावर त्याचा रंग बदलतो आणि चव देखील गोड लागते.
पाणी घालून तपासा
खरे आणि नकली केसर ओळखण्यासाठी त्यात पाणी घालून चेक करा. केसर पाण्यात टाकल्यानंतर लगेच रंग निघून जातो. केसरचा रंग भगवा असल्याने तो पाण्यात मिक्स होण्यास थोडा वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही दुधामध्ये देखील केशर टाकून बघू शकता. दुधामध्ये केसर टाकल्यावर हळूहळू त्याला रंग येण्यास सुरुवात होतो. कोमट दुधामध्ये केसर टाकल्यावर हळूहळू रंग येतो. पण जर नकली केसर असेल तर ते पाण्यात रंगाऐवजी त्याचे तंतू पाण्यात विरघळतात.