आयुष्मान भारत कार्डसाठी पात्रता कशी तपासावी? जाणून घ्या प्रक्रिया

0
3
Ayushman Bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. सरकारने आता नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी देखील घेतलेली आहे. यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षाला पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार अगदी मोफत मिळत आहे. परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे गरजेचे आहे. पण या कार्डसाठी आपण पात्र आहे की नाही? हे कसे ओळखावे. आजकाल लोकांच्या बद्दलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे आजार देखील वाढत चाललेले आहेत. आणि सर्वसामान्य लोकांना या आजारांचे निदान करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणूनच देशातील मृत्यूदर देखील वाढलेला आहे

देशातील नागरिकांचा विचार करूनच आता भारत सरकार त्यांना मोफत आरोग्य विमा योजना देत आहे. भारत सरकारने 2018 साली ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत करोडो नागरिकांना लाभ झालेला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निश्चित करून दिलेल्या आहेत. तुम्ही जर त्या पात्रतेत बसत असाल तरच तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवता येईल.

पात्रता कशी तपासायची?

जर तुम्हाला देखील प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्रता तपासावी लागेल.यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजच्या वरच्या बाजूला तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.

त्यानंतर तुम्हाला मी पात्र आहे का असा पर्याय दिसेल तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थीवर क्लिक करावे आणि खाली एक कॅपच्या कोड दिला असेल. तो टाकावा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा व तुमच्या मोबाईल नंबर एक ओटीपी येईल. तो ओटीपी देखील तुम्हाला तिथे टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्ही या स्कीममध्ये लॉगिन करू शकता. तुम्हाला काही पर्याय मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा यांसारखे पर्याय निवडायचे आहेत. आणि सर्च बार ऑप्शन मध्ये तुम्हाला आधार निवडावा लागेल. तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सर्चवर क्लिक करावे लागेल. आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल.

आयुष्मान कार्ड घरबसल्या बनवता येते

तुम्ही जर हे आयुष्मान भारत कार्ड बनवण्यास पात्र असाल तर तुम्ही घरबसल्या देखील हे कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्मान ॲप डाऊनलोड करावे लागेल. आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासावे लागेल. त्यानंतर आधारित एक केवायसी करावे लागेल. ही केवायसी केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आयुष्मान कार्ड दिसेल ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता.