Best Jugad : आता घरातील कूलरलाच बनवा AC; फक्त 30 रुपये खर्च, जाणून घ्या कसं ते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : उन्हाळा आला कि गर्मी वाढते, गर्मी वाढली कि अंगाची होणारी लाही लाही होते. मग ती थांबवण्यासाठी आपण पंख्याखाली बसतो, AC सुरु करतो, थंड पाण्याने आंघोळ करतो. ज्यांना AC परवडत नाही ते गर्मीला पळवण्यासाठी AIR COOLER चा वापर करतात. आज आम्ही तुम्हाला अत्यंत अल्प दरांत घरच्या घरी AIR COOLER चा वापर करून त्यातून कश्याप्रकारे AC सारख्या थंड हवेचा अनुभव घेऊ शकता हे सांगणार आहोत.

एअर कंडिशनर घर थंड करण्याचं काम करतो परंतु बाहेर उष्णता वाढवतात. एअर कंडिशनरमधून बाहेर पडणाऱ्या वायूंचा हवामान बदलात मोठा वाटा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाला एसी विकत घेणे परवडत नाही . म्हणून, आम्ही तुमच्यासाठी एक शानदार युक्ती घेऊन आलो आहे जी तुमच्या घरातील एअर कूलरला एअर कंडिशनरमध्ये बदलेल. यासाठी तुम्हाला फक्त काही रुपये खर्च करण्याची आवश्यकता आहे आणि मग तुम्हीही अत्यल्प दरांत तुमच्या कूलरमधून AC सारखी थंड हवा वाहताना अनुभवू शकता आणि ती थंड, शुद्ध हवा अनुभवत असताना बाहेरचे हवामानही प्रदूषित वा गरम होणार नाही.

तुमच्या कूलरला एअर कंडिशनरमध्ये रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. त्याला थंड हवा वाहण्यास तयार करणे हाच उपाय आहे त्यासाठी आपल्याला काही साधनांची आवश्यकता आहे.

आवश्यक साधने

ह्यासाठी तुम्हाला एक मातीचे मडके हवे आहे. ते तुमच्या कूलरच्या टाकीत व्यवस्थित बसेल याची काळजी घ्यावी लागेल. खूप मोठे किंवा खूप लहान मडके न घेता योग्य य आकाराचे मडके विकत घ्यावे जर तुमच्याकडे मटका नसेल तर तुम्ही घरात उपलब्ध असलेले मातीचे भांडे वापरू शकता.

कसे बनवावे

प्रथम एक भांडे वा मडके घ्या. त्याच्या खाली तीन मध्यम आकाराची छिद्रे करा. हे छिद्र तुम्ही खिळ्याच्या मदतीने किंवा ड्रिल मशीनच्या मदतीने करू शकता. भांडे वा मडके नीट धुवा आणि कूलरच्या टाकीत ठेवा, जिथे तुम्ही पाण्याचा पंप ठेवला आहे. तिन्ही छिद्रे खाली तोंड करून हळुवारपणे पंप भांड्यात ठेवा. आता टाकी पाण्याने भरा. लक्षात ठेवा की थेट भांड्यात पाणी घालू नका. पाणी भरल्यानंतर पंपाने कुलर सुरू करा. काही मिनिटांत टाकीचे पाणी हवेने थंड होईल आणि थंड केलेले पाणी कूलरभोवती पंप केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला थंड हवा मिळेल.आता कूलर चालू केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत एसीसारखी थंड हवा मिळेल.