पॅन कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त कशी करावी? एका क्लिकवर प्रोसेस जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे पॅन कार्ड (Pan Card). बँक खात्यासंबंधीत काम असो किंवा एखाद्या स्कीमचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. परंतु याच पॅन कार्डवर चुकीची माहिती टाकण्यात आली असेल तर त्यामुळे मोठा घोळ होऊ शकतो. ही माहिती पुन्हा दुरुस्त करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही पॅन कार्डवर नाव, नंबर, पत्ता, जन्मतारीख यासंदर्भात टाकण्यात आलेले चूकीची माहिती ऑनलाइन दुरुस्त करू शकतात. ती कशी जाणून घ्या.

Pan Card वरील माहिती दुरुस्त कशी करावी?

  • सर्वात प्रथम NSDL ई-गव्हर्नन्स वेबसाईट रून पॅन कार्ड अपडेटसाठी ई-गव्हर्नन्सच्या पोर्टलवर जावा.
  • त्यानंतर सर्व्हिसेस टॅबवर जावा आणि ड्रॉपडाउन मेनुतून PAN असे निवडा.
  • पुढे PAN करेक्शन मेनू शोधण्यासाठी खाली स्क्रोल करत या आणि अप्लाय हा पर्याय निवडा.
  • पुढे PAN करेक्शनमध्ये जाऊन Apply वर क्लिक करा.
  • त्यानंतर Submit पर्याय निवडून तुमचा पॅन क्रमांक तेथे टाका. नंतर पॅन कार्ड मोड हा पर्याय निवडून सबमिटवर क्लिक करा.
  • नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल. त्यावर ओके क्लिक करा.
  • पुढे तुमचा नाव आणि पत्ता त्याठिकाणी भरा. नंतर Next Step वर क्लिक करा.
  • पुढे व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड नंबर तेथे टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा.
  • यानंतर आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • ही प्रोसेस केल्यानंतर पॅन कार्ड दुरुस्तीसाठी साधारण 15 दिवसांचा कालावधी लागेल. तुमच्या पॅन कार्ड पोस्टाने पाठवल्यास तुमच्या फोनवर एक मेसेज येईल.