हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| साखर शरीराला हानिकारक असते म्हणून अनेकजण साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. मात्र सध्या गुळामध्येच मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत आहे. अनेक दुकानात सेंद्रिय गुळाच्या नावाखाली भेसळयुक्त गुळ विकला जातो. त्यामुळे नेमका सेंद्रिय गुळ कोणता आणि भेसळ असलेल्या गुळ कोणता यातील फरक ओळखता येत नाही. आज आपण या दोन्ही गुळांमधील फरक कसा ओळखायचा हेच जाणून घेणार आहोत.
भेसळयुक्त गुळ
भेसळ युक्त गुळ म्हणजेच अशुद्ध असलेला, ज्यामध्ये साखर मिसळलेले आहे तो गुळ काळा नाही तर पांढरा दिसतो. तसेच त्याची चव देखील थोडीफार आपल्याला साखरेसारखी जाणवतो. अनेकवेळा भेसळयुक्त गुळामध्ये वेगवेगळे केमिकल देखील वापरण्यात येतात. त्यामुळे हा गुळ पाण्यात टाकला की लगेच पाण्यावर थोडासा फेस तयार होतो. तुम्ही जर बाजारात गेल्यानंतर गुळ घेताना पहिल्यांदा त्याचा रंग पहा. पिवळा दिसणारा गुळ हा भेसळयुक्त म्हणजेच रासायनिक असतो. तसेच सेंद्रिय गुळ हा ब्राऊन रंगाचा किंवा जास्त काळपट रंगाचा दिसतो. भेसळयुक्त गुळ आपल्याला जास्त चमकताना देखील दिसतो.
सेंद्रिय गुळ
सेंद्रिय गुळाचा रंग हा डार्क ब्राऊन रंग असतो. सेंद्रिय गुळ किंवा अति शुद्ध असणारा गुळ खाल्ल्यानंतर अधिक गोड लागतो. तुम्ही बाजारातून आणलेल्या गुळाचा जास्त भुसा पडत असेल तर तो रासायनिक गुळ आहे. तसेच, एखादा गुळ कठीण जाणवत असेल तर तो शुद्ध गुळ असतो. सेंद्रिय वा शुद्ध असणारा गुळ मऊ जाणवतो. सेंद्रिय गुळनेहमी महाग भेटतो. परंतु सेंद्रिय गुळ खाल्ल्याचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची मागणी जास्त प्रमाणात होते.