Credit Card : आता क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी मिळणार क्रेडिट कार्ड! जाणून घ्या प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशातील अधिकतम जनता हि आता क्रेडिट कार्डनेच बिल भरत आहे. क्रेडिट कार्डचा उपयोग हा शॉपिंग, लाईटबील, पाण्याचे बिल अश्याच प्रकारे विविध ठिकाणी करण्यात येतो. ज्यांचा क्रेडिट स्कोर हा उत्तम आहे अश्या आपल्या ग्राहकांना कुठलीही बँक क्रेडिट कार्ड देते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट स्कोर चांगला नसला तरीसुद्धा क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे याबाबत माहिती देणार आहोत.

ज्यांचा क्रेडीट स्कोर खराब आहे त्यांना सिक्योर्ड क्रेडिट कार्ड बनवावे लागते जे FD द्वारे सिक्योर्ड असते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एसबीएम बँक (India) ह्या बँका आपल्या ग्राहकांना FD सोबत हि सुविधा देतात. बहुतेक प्रकरणात क्रेडिट कार्डची लिमिट हि FD तील जमा रकमेच्या 80% ते 90% रक्कमेपर्यंतच असते. जर कार्ड होल्डर मंथली क्रेडिट चार्ज भरत नसेल तर अश्या स्थितीत बँक त्या कार्डशी कनेक्टेड FD तुन ती रक्कम रिडीम करु शकते. एफडी कार्ड च्या तुलनेत क्रेडिट कार्ड वरील टॅक्स आणि चार्जेस हे अनसिक्योर्ड कार्ड च्या तुलनेत स्वस्त असतात.

एसबीआई कार्ड उन्नति (SBI Card Unnati)

चार वर्षांपर्यंत एसबीआई कार्ड उन्नति वर कुठल्याच प्रकारचे चार्जेस लागत नाही पाचव्या वर्षांपासून ह्यावर प्रति वर्ष ४९९/- इतकी रक्कम चार्जेसच्या रूपात आकारली जाते. हे कार्ड होल्डरच्या FD वरील २५०००/- व अधिक रुपयांवर कार्ड धारक प्राप्त करू शकतात

ICICI इंस्टेंट प्लेटिनम क्रेडिट कार्ड (ICICI Instant Platinum Credit Card)

त्वरित आणि फ्री क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आईसीआईसीआई बैंक इंस्टेंट प्लेटिनम क्रेडिट कार्ड एक उत्तम पर्याय आहे.

ह्यात कुठल्याच प्रकारचे जॉइनिंग व वार्षिक चार्ज भरावे लागत नाही.

Axis Bank Insta Easy Credit Card (एक्सिस बैंक इंस्टा ईजी क्रेडिट कार्ड)

इंस्टा ईजी क्रेडिट कार्ड मध्ये FD डिपॉजिट अमाउंट च्या 80% पर्यंत तक क्रेडिट लिमिट उपलब्ध होऊ शकते.

जर कुठल्याच प्रकारची थकबाकी शिल्लक नसेल तर हे क्रेडिट ५० दिवसांसाठी फ्री मिळते.

बीओबी एश्योर क्रेडिट कार्ड (Bank of Baroda Assure credit card)

ह्यात इमरजेंसी च्या वेळी क्रेडिट लिमिट मधील 100% पर्यंत रक्कम विड्रॉल करू शकतो.