How to Identify Adulteration In Paneer | दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात पनीर हा पदार्थ तर सगळेजण आवडीने खातात. कारण पनीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. त्याचप्रमाणे पनीर चवीला देखील खूप चांगले असते. त्यामुळे आहारतज्ञ आठवड्यातून एकदा तरी पनीर खाण्याचा सल्ला देतात.
लहान मुलांना पनीरचे वेगवेगळे पदार्थ खूप आवडतात. पनीर पराठे, पनीर पकोडे, पनीरची भाजी असे वेगवेगळे पदार्थ लहान मुले आवडीने खातात. आपण देखील पनीर आरोग्यासाठी चांगले आहे, म्हणून मुलांना देत असतो. परंतु या पनीरमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. पनीरमध्ये युरिया आणि डिटर्जंटच्या घातक पदार्थांचा वापर केलेला जात आहे.
पनीरमधील भेसळ कशी ओळखायची? | How to Identify Adulteration In Paneer
- यासाठी तुम्ही पनीरचा एक लहानसा तुकडा घेऊन तुमच्या हातात दाबून पहा. दाबल्यानंतर त्या पनीरचे लहान लहान तुकडे होत असतील, तर ते पनीर भेसळयुक्त पनीर आहे.
- एका पातेल्यात पाणी घ्या त्या पाण्यात पनीरचा तुकडा टाका आणि पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पाण्यात तुरीच्या डाळीचे पीठ टाका. दहा मिनिटांनी पनीरचा रंग लालसर झाला, तर त्यामध्ये भेसळ असते.
- बाजारात अनेक लोक सुटे पनीर विकतात . त्यामुळे पनीर घेताना नेहमी थोडं खाऊन पहा. जर ते आंबूस चवीचे लागत असेल तर ते पनीर घेऊ नका.
त्यामुळे पनीर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपण भेसळयुक्त पनीर खाल्ले तर त्याचा आपल्या आरोग्याला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होत आहे. त्यामुळे शक्यतो घरी बनवलेल्या गोष्टींना प्राधान्य द्यावे. पनीर आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी देखील सहजपणे बनवू शकतो. त्यामुळे आपण अगदी सकस आणि ताजे अन्न खाऊ शकतो आणि भेसळयुक्त (How to Identify Adulteration In Paneer) पदार्थांपासून आपला बचाव करू शकतो.