How To Identify Injected Watermelon | उन्हाळा सुरू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये सगळेजण हंगामी फळे खात असतात. उन्हाळ्यामध्ये खास करून संत्री, कलिंगड, टरबूज, आंबे ही फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. कारण यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. कलिंगड हे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. कारण कलिंगडामध्ये जवळपास 92 टक्के पाणी असते. आणि 6 टक्के साखर असते. त्यामुळे आपल्या बॉडीच्या हायड्रेशनसाठी कलिंगड हे एक चांगले फळ आहे. मे महिना हा कलिंगडांचा सीजन आहे. त्यामुळे बाजारात देखील आणि कलिंगड विकायला असतात. परंतु बाजारात सध्या नकली कलिंगडाची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
कलिंगड लवकर पिकावे म्हणून लोक केमिकल इंजेक्शन देतात. पण हे केमिकल इंजेक्शनने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? यासाठी एक सोपी ट्रिक आम्ही सांगणार आहेत. अगदी लाल कलिंगड खरेदी करावे का? त्याचप्रमाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हाती आलेली माहितीनुसार कलिंगड लाल दिसावे आणि रसाळ दिसण्यासाठी विक्रेते त्यावर केमिकल इंजेक्शनचा वापर करतात. यासाठी ऑक्सिटॉसिनचे इंजेक्शन दिले जाते. ज्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. या इंजेक्टर कलिंगडामध्ये नाइट्रेट ऑफिशियल करत मिथेनोल, कॅल्शियम कार्बोइड आणि ऑक्सिडोसीन यांसारखे रसायने असतात. ही पोटासाठी खूप घातक ठरतात. त्याचप्रमाणे कलिंगड लवकर पीकावे यासाठी नायट्रोजनचा वापर देखील करून जातो. हा एक विषारी घटक आहे. त्यामुळे शरीराला दुष्परिणाम होतो.
अन्नातून विषबाधा | How To Identify Injected Watermelon
कलिंगड लाल रंग दिसण्यासाठी कृत्रिम रंगाचा देखील वापर केला जातो. यामध्ये लेड क्रोमेट मिथेनॉल येल्लो आणि सुडान रेड यांचा उपयोग करतात. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.
लिव्हर-किडनी होऊ शकते डॅमेज
कलिंगड लवकर विकण्यासाठी अनेकजण कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात. कॅल्शियम कार्बोइड हे यकृत आणि किडनीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बोइड हे यकृत आणि किडनीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते.
इंजेक्टेड कलिंगड कसे ओळखावे?
अनेक वेळा आपल्याला कलिंगडावर पांढरी किंवा पिवळी पावडर दिसते. ती धूळ समजून तुम्ही साफ करता पण ही पावडर खरंतर कॅल्शियम कार्बोर्डची असते. त्यामुळे कलिंगड लवकर पिकते. या कॅल्शियम कार्बोर्डचा वापर करून आजकाल आंबा केळी पिकवले जातात. बाजारात अत्यंत लालबंद दिसणारे कलिंगड खरेदी करू नका. कलिंगडामध्ये केमिकलचा वापर केल्याने त्याचा रंग जास्त गडद झालेला असतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.