How To Identify Plastic Rice | तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? ‘या’ ट्रीक्सने ओळखा तांदूळ खरा की बनावट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

How To Identify Plastic Rice | आजकाल भेसळयुक्त पदार्थ दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. तूप, तेल, मसाले तसेच अनेक धान्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली दिसत आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने लोकांच्या आरोग्य देखील आता बिघडत चाललेले आहे. आजकाल तांदळामध्ये देखील भेसळ होत आहे. तांदळाचे भाव वाढत असल्याने आता लोकांना फसवून प्लास्टिकचा तांदूळ दुकानदार ग्राहकांना देत आहे. या प्लास्टिकच्या तांदळाचा (How To Identify Plastic Rice ) रंग, सुगंध आणि चव देखील सारखीच असते. त्यामुळे लोकांना खरा तांदूळ कोणताही ओळखता येत नाही.

परंतु हा प्लास्टिकचा तांदूळ खाल्ल्याने अनेक आजार होत आहे. आपली फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला भेसळयुक्त तांदूळ ओळखणे खूप गरजेचे आहे. आता हे भेसळयुक्त तांदूळ कसे असतात? ते कसे ओळखायचे? आणि त्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला काय तोटा होतो? या सगळ्याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

भेसळयुक्त तांदूळ कसा ओळखायचा ?

आपण तांदूळ शिजवत घालण्यापूर्वी ते धुवतो आणि तांदूळ पाण्यात पडतो. चांगल्या प्रतीचे तांदूळ हे पाण्याच्यावर देखील येतात. परंतु प्लास्टिकचे तांदूळ पाण्यावर तरंगू लागतात. कारण प्लास्टिकचे तांदूळ कधीही पाण्यात बुडत नाही. त्यामुळे या ट्रिकमुळे तुम्ही सहज पद्धतीने भेसळयुक्त तांदूळ कोणता आहे. हे ओळखू शकता. त्याचप्रमाणे बाजारातून तांदूळ खरेदी करण्यापूर्वी ते दाणे आधी चावून खा. ते दर्जेदार असतील तर ते सहज चघळले जातात. परंतु त्यात भेसळ असेल तर दातांना कडक जाणवतील.

तांदूळ भाजून घ्या | How To Identify Plastic Rice

तांदूळ भाजून देखील कोणत्या तांदूळ भेसळयुक्त आहे. हे आपण ओळखू शकतो. यासाठी तव्यावर तांदळाचे दाणे टाका आणि मंद आचेवर भाजून घ्या. जर तांदळातून जळण्याचा वास येत असेल, तर समजून जा की हे तांदूळ भेसळयुक्त आहे. जेव्हा तुम्ही भात शिजवता तेव्हा तांदूळ दाणेदार बनतो. किंवा अजिबात चिटकत नाही. प्लास्टिकचा तांदूळ चिकटतो आणि त्याच्या गुठळ्या होतात. त्यामुळे तुमची तांदळापासूनची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.