How To Identify Sweet Mango | आंबे खरेदी करताना गोड आणि रसाळ आंबा कसा ओळखला? जाणून घ्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

How To Identify Sweet Mango | उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आंबा सगळ्यांना खूप आवडतो. बाजारात अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. अगदी मार्च महिन्यापासूनच लोक आंब्याची वाट पाहत असतात. एप्रिल महिन्यामध्ये आंबा बाजारात विकण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे काही दिवस या आंब्याची किंमत खूप असते. परंतु आंबा खरेदी करताना ग्राहकांना काळजी घेणे, खूप गरजेचे असते. कारण बाहेरून दिसणारा लाल आणि पिवळा आंबा हा चवीला देखील चविष्ट असेलच, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कारण आज काल केमिकल पद्धतीने आंबे पिकवले जातात. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज आम्ही या लेखातून योग्य आंबा कसा निवडावा (How To Identify Sweet Mango) याबद्दल माहिती देणार आहोत.

रंगापेक्षा सालीवरून ओळखा

सध्या बाजारात वेगवेगळ्या राज्यातून आंबे येत आहेत. आणि त्या राज्यानुसार त्यांचा आकार, प्रकार, रंग आणि चव वेगवेगळे असतात. हिरवा आंबा आजकाल कृत्रिमरित्या पिकवला जातो. परंतु आजकाल आंब्याची चव आणि रंग त्याच्या विविधतेवर अवलंबून असतो. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही आंबा खरेदी करता, तेव्हा त्याच्या रंगापेक्षा सालीकडे जास्त लक्ष द्या. जर तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल, तर त्या आंब्याच्या सालीवर एकही डाग नसतो. परंतु तो आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला नसेल, तर त्यावर काळे डाग दिसतात. त्यामुळे रंगावरून योग्य आंबा ओळखता येतो.

देठांवरून आंबा ओळखा | How To Identify Sweet Mango

तुम्ही घेतलेला आंबा हा गोड आहे. हे त्याच्या देठावरून ओळखू शकता. यासाठी आंबा खरेदी करताना त्याचा देठाचा भाग नीट तपासा. दाब दिल्यास किंवा बाकीचा भाग फुगीर आणि मऊ असल्यास आंबा पूर्णपणे पिकलेला आहे आणि ताजा गोड असतो.

वासावरून ओळखा

आंबा खरेदी करण्यापूर्वी त्याच्या वासावरून ओळखा. पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ही फार जुनी पद्धत आहे. त्या आंब्याच्या देठाचा जर वास येत असेल, तर तो आंबा खूप गोड आणि मधुर असतो. तसेच हा आंबा नैसर्गिक रित्या पिकवलेला देखील असतो.

आंबा दाबून तपासा

अनेक वेळा बाहेरून आंबे पिकलेले असतात. परंतु आतून ते कच्चे असतात. त्यामुळे आंबा दाबून तपासा आंबा दाबल्यावर तो जास्त घट्ट नसावा. त्याचप्रमाणे जास्त चपटा देखील नसावा. आतून पिकलेला आंबा हा बाहेरून कच्चा असू शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करताना तो दाबून पहा.