How To Increase Credit Score | आधुनिक जीवनात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आपल्या सिबिल स्कोर चांगला असणे खूप महत्त्वाचे आहे. चांगला असणारा सिबिल स्कोर ही तुमची आर्थिक ताकद दाखवते. त्याचप्रमाणे सिबिल स्कोरचा अनेक घटकांवर परिणाम होतो. जर तुमचा सिबील स्कोर (How To Increase Credit Score) खराब असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन मिळत नाही. परंतु जर तुमचा सिबील स्कोर खराब असेल. आणि तुम्हाला जर चांगला करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चांगलं करू शकता.
तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा | How To Increase Credit Score
सिबील सकोर तुमच्या क्रेडिट रिपोर्टची एक प्रत घ्या आणि ती काळजीपूर्वक वाचा. तुमचा सिबिल स्कोर कमी करणाऱ्या काही चुकांची माहिती आणि फसवणूक या सगळ्या गोष्टी तिथे असते. ते तपासा तुमची सर्व बिले वेळेवर भरा. क्रेडिट कार्डची बिले असो किंवा ईएमआय असो किंवा विजेची बिल असो, या सगळ्याचा देखील तुमच्या सिबिल स्कोरवर वाईट परिणाम होतो.
क्रेडिट कार्डचा वापर कमी करा
तुम्ही कमीत कमी क्रेडिट कार्डचा वापर करा. क्रेडिट कार्डमध्ये 30% पेक्षाही कमी वापर करण्याचा प्रयत्न करा. जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
जास्त कर्जासाठी अर्ज करू नका
ज्यावेळी तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, त्यावेळी क्रेडिट अहवालात चौकशी नोंदवली जाते. यामुळे तुमचा स्कोर कमी कालावधीसाठी कमी होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा.
क्रेडिटमध्ये विविधता आणा
क्रेडिट कार्ड कर्जागृह कर्ज यांसारख्या विविध प्रकारचे कर्ज वापरल्याने तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होऊ शकतो. परंतु तुम्ही त्याची परतफेड करू शकता एवढेच कर्ज घ्या.
तज्ञांची मदत घ्या
जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल, तर आर्थिक सल्लागार किंवा क्रेडिट सल्लागाराची मदत घ्या. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच तुम्ही सिबिल स्कोर सुधारण्यासाठी प्रयत्न करा.