How To Keep Plastic chair Clean And New | घरातील जुन्या कळकट प्लॅस्टिकच्या खुर्च्या होतील चकचकीत; वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Keep Plastic chair Clean And New प्लास्टिकच्या खुर्च्या या आजकाल सगळ्यांच्याच घरी असतात. या खुर्च्या अगदी हलक्या असतात. त्याचप्रमाणे आपल्याला त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. अगदी लहान मुलांपासून सगळेजण या खुर्चीचा वापर करतात. या खुर्च्या पांढऱ्या रंगांमध्ये असतात. त्यामुळे त्या खराब झाल्याबद्दल जुन्या दिसू लागतात. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला या खुर्च्या नव्या सारख्या चमकदार बनण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (How To Keep Plastic chair Clean And New) ज्यामुळे तुमच्या खुर्च्या अगदी नवीन होतील.

प्लास्टिकच्या खुर्चीचा वापर दररोजच्या वापरात होत असतो. त्यामुळे त्या खराब लवकर होतात. या खुर्च्या नियमित स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला एक कपडा घ्यावा लागेल आणि हलक्या डिटर्जंटचा वापर करू शकता. आठवड्यातून कमीत कमी एकदा हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या घरात जर प्लास्टिकच्या खुर्च्या खराब झाल्या असतील. तर त्यात बेकिंग सोडा आणि पाणी वापरून त्याची पेस्ट बनवा. आणि खुर्च्यांवर लावा आणि नंतर धुवून ते कापडाने पुसून घ्या. त्यानंतर तुमच्या खुर्च्या अगदी नव्या सारख्या स्वच्छ आणि चमकदार होतील.

खुर्च्या उन्हात ठेवू नका | How To Keep Plastic chair Clean And New

तुमच्या प्लास्टिकच्या खुर्च्या या थेट उन्हात ठेवू नका. त्यामुळे खुर्च्यांचा रंग फिका पडतो. तसेच जास्त सूर्यप्रकाशामुळे त्यांच्यावर परिणाम देखील होऊ शकतो आणि त्या तुटू शकतात.

खुर्च्यांना पेंटिंग करा

तुम्ही खुर्च्या चांगल्या आणि छान दिसण्यासाठी त्यांना पेंटिंगही करू शकता. तुम्ही पेंटिंग केल्याने तुमच्या खुर्च्यांना नव्या सारखा लूक येईल. स्प्रेच्या मदतीने तुम्ही तुमची खुर्ची पुन्हा एकदा चांगली करू शकता. त्यामुळे धूळ, घाण यासारख्या गोष्टी खुर्चीवर बसणार नाहीत.

खुर्च्यांवर स्क्रॅचेस येणार नाही

प्लॅस्टिकच्या खुर्च्या आपण जर नीट वापरल्या नाही, तर त्या खराब होत्यात. तुम्ही खुर्च्या साफ करत असाल, तर त्या जास्त रगडू नका. त्यामुळे खुर्च्यांवर स्क्रॅचेस येतात. आणि ते दिसायला अजिबात नीट दिसत नाही. त्यामुळे खुर्च्यांचा वापर करताना अगदी सांभाळून करा.