तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट इतर कोणी पाहत तर नाही ना? ‘या’ पद्धतीने करा चेक

Whats App
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र किंवा इतर कोणी तुमचं चॅट पाहत नाही ना? असा प्रश्न आपल्याला पडतो. तुमचं चॅट कोणी लपून पाहतं, की नाही हे पाहण्यासाठी एक सोप्पी ट्रिक वापरा. याद्वारे युजर्स सहजपणे आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची माहिती मिळवू शकतात.

अनेकदा युजर्स आपल्या स्वत:च्या चुकीमुळेच समोरच्याला आपलं चॅट पाहण्याची संधी देत असतात. युजर्सच्या बेजबाबदारपणामुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्यास हॅकर्सना मदत होते. यामुळे एखादा व्यक्ती तुमच्या चॅटचा चुकीचा वापरसुद्धा करू शकतो. त्यामुळे कोणी तुमचं चॅट लपून पाहत तर नाही ना हे तपासणं आपल्यासाठी महत्वाचे आहे. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची तुम्हाला गरज नाही युजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरच ही माहिती मिळवू शकतात.

खालीलप्रमाणे प्रक्रिया करा
१. सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
२. आता WhatsApp Web पर्यायावर क्लिक करा.
३. जर तुम्ही स्वत: लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन केलं नसेल आणि तरीही WhatsApp Web मध्ये ते लिंक्ड असल्याचे दिसत असेल, तर तर दुसरा व्यक्ती तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट पाहत असल्याची शक्यता असू शकते.
४. जर तुम्ही एखाद्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप लिंक केलं असेल आणि लॉगआउट करण्यास विसरल्यास, दुसऱ्या व्यक्तीने ही संधी साधून आपल्या लॅपटॉपमध्ये तुमचं व्हॉट्सअ‍ॅप लिंक केलेलं असू शकते.
५. यामुळे आधीपासूनच तुमचं WhatsApp Web Linked दिसत असेल, तर ते त्वरित लॉगआउट करा.