How To Make Curd Instantly | कोणताही ऋतू असला तरी आपल्याकडे स्वयंपाक घरात नेहमीच दही, ताकाचा आणि दुधाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आता उन्हाळा सुरू होत आहे आणि घरामध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. अनेकजण दुपारी दही खातात तसेच दह्याची कढी, दही वडा तसेच दहीभात यांसारखे पदार्थ करतात. यासाठी आपण बऱ्याच वेळा बाहेरून दही आणतो. कारण आपल्याकडे विरजण नसते. त्यामुळे दही घरच्या घरी करायचे कसे हा आपल्याला प्रश्न पडतो परंतु घरी केलेले दही हे चांगले असते. आणि आपल्या तब्येतीसाठी देखील पौष्टिक असते.
परंतु आपण जर घरी लावली तर ते खूप पातळ होतं आंबट होत नाही. किंवा जास्तच आंबट होतं. अशा अनेक तक्रारी गृहिणीकडून येतात तर आता आपण विरजनाशिवाय घरच्या घरी दही कसे लावायचे? ते पण अगदी दहा मिनिटात दही लावणे सोपे आहे तर आपणही दही लावायची पद्धत जाणून घेऊया.
लिंबू
वीरजनाशिवाय दही लावायचे असेल तर तुम्ही सगळ्यात आधी एका भांड्यात दूध घ्या. त्यात अर्धा लिंबू पिळा आणि एका चमच्याच्या मदतीने हळूहळू त्यात टाका. यावर झाकण ठेवा आणि बारा तासांसाठी ते वेगळे करा. त्याचप्रमाणे तुम्ही सुती कपड्यात ठेवून ते दही लावू शकता जेणेकरून ते गरम राहील पटकन नाही लावण्यासाठी आधी कॅस्ट्रोलमध्ये थोडे गरम पाणी करा आणि दह्याचं भांड ठेवून बंद करा.
मिरची | How To Make Curd Instantly
मिरचीचा वापर करून देखील तुम्ही लगेच दही लावू शकता. सगळ्यात आधी तुम्ही दूध उकळून थंड करा त्यात मिरच्या च्या देठासह हिरवी मिरची घाला. त्यानंतर दुधात मिसळून ते दूध कोरड्या कपड्याने झाकून ठेवा सकाळपर्यंत दही तयार होईल.
लाल मिरची
हिरव्या मिरचीप्रमाणे लाल मिरचीचा वापर करून देखील तुम्ही घरच्या घरी विरजणाशिवाय दही लावू शकता. दही लावण्यासाठी तुम्ही सुकी लाल मिरची उकळून घेतलेल्या दुधात सहा ते सात तासांसाठी झाल्यानंतर ते दही लागलेलं तुम्हाला दिसून येईल.
चांदीचा शिक्का किंवा अंगठी
तुम्ही चांदीचा शिका किंवा चांदीची अंगठी दुधात घालून आठ तासांसाठी गरम ठिकाणी ठेवा. त्यानंतर आठ तासानंतर हे दही लागलेला असेल दही लावण्याचा हा देखील एक सोप्पा आणि चांगला उपाय आहे.