शेवग्याच्या पानांची मस्त चटणी ; केवळ चमचाभर चटणी हाडांना देईल ताकद

0
1
kitchen tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय आहारपद्धती जगभरात अतिशय प्रसिद्ध असून ही आहारपद्धती केवळ जेवणाची लज्जत वाढत नाही तर भारतीय हवामानानुसार शरीरासाठी सुद्धा लाभदायक आहे. जेवणाच्या ताटात लोणच , चटण्या असलया की जेवण थोडं जास्त जातं असं म्हणतात. आजच्या लेखात आपण शेवग्याच्या पानांची पौष्टिक कशी करायची पाहुयात ,,,

साहित्य

दोन टेबलस्पून तेल
दोन टेबलस्पून चणाडाळ
दोन टेबलस्पून पांढरी उडीद डाळ
दोन टेबलस्पून शेंगदाणे
दोन टेबलस्पून धने
दोन टेबलस्पून जिरे
सहा ते सात सुक्या मिरच्या
दोन टेबल स्पून आळशी
दोन कप शेवग्याच्या शेंगाचा पाला
कढीपत्ता एक कप चिंच एक टेबलस्पून
मीठ चवीनुसार.

कृती

सगळ्यात आधी एक मोठी कढई घ्या. त्यात तेल टाका तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात चणाडाळ आणि पांढरी उडीद डाळ घाला त्यानंतर त्यात शेंगदाणे धणे जिरे लाल सुक्या मिरच्या आळशी घालून सगळे जिन्नस एकत्रितपणे तेलामध्ये परतून घ्या.

हे सगळे जिन्नस तेलात परतून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून थोडं थंड होण्यासाठी ठेवा.

आता एका भांड्यात थोडं तेल घेऊन ते तेल गरम करा या गरम तेलात शेवग्याच्या पानांचा पाला घालून हलकेच परतून घ्या.

त्यानंतर त्याच भांड्यात कडीपत्ता घालून तो देखील थोडा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यात तेलात भाजून घेतलेले सगळे जिन्नस आणि चिंचेचा छोटा गोळा घालून सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत वाटून त्याची बारीक पूड करा.

त्यानंतर वाटून घेतलेल्या मिश्रणात भाजून घेतलेल्या शेवग्याच्या पानांचा पाला आणि कढीपत्ता घाला. पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकत्रित वाटून त्याची बारीक पूड करून घ्या शेवग्याच्या पाल्याची सुकी चटणी तयार आहे.

ही चटणी तुम्ही एका काचेच्या हवा बंद बरणीत स्टोअर करून ठेवू शकता.