Natural Holi Colour | लवकरच रंगांचा सण येणार आहे. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण काही दिवसातच येणार आहे त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या होळीचे रंग रंगपंचमीचे साहित्य विकायला सुरुवात झालेली आहे. परंतु आपण जे बाजारातून रंग विकत घेतो, त्यामध्ये केमिकल जास्त असते. असे केमिकल आपल्या त्वचेला लागल्यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. त्याचप्रमाणे पर्यावरणाची देखील हानी होत. त्यामुळे म्हणूनच होळी खेळताना असे रंग टाळावे.
यावर्षी तुम्ही होळी खेळण्यासाठी घरगुती पदार्थ (Natural Holi Colour) वापरून रंग तयार करू शकता. आता घरगुती पदार्थ वापरून तयार करणे खूप सोपे आहे आता ते कसे करायचे ते आपण पाहूया.
होळीसाठी घरी रंग कसे तयार करावे? | Natural Holi Colour
यावर्षी होळी खेळण्यासाठी तुम्हाला घरच्या घरी वेगवेगळे नॅशनल रंग तयार करायचे असतील, तर तुम्हाला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि दुसरं म्हणजे टाल्कम पावडर या दोघांचा बेस वापरून आपण वेगवेगळे रंग तयार करू शकतो.
यासाठी सगळ्यात आधी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यावे. त्यामध्ये एक चमचा टाल्कम पावडर टाकावी आणि हे दोन्ही पदार्थ चांगले एकत्र करून घ्यायचे. तुम्हाला पिवळा रंग तयार करायचे असेल, तर त्या वाटीत एका वाटीत हळद घ्या आणि तिच्यामध्ये पाणी टाकून तो रंग मिक्स करा. आता हळदीचे पाणी कॉर्नफ्लोर आणि टाल्कम पावडर वाटीत टाका आणि नंतर ते चांगले मिक्स करून घ्या..
आता ही पिवळ्या रंगाची वाटी उन्हामध्ये ठेवा. त्यानंतर रंग कोरडा झाले की, मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा फिरवून घ्या. असे केल्याने त्या रंगातल्या गाठी निघून जातात आणि रंग कोरडा पावडर सारखा होतो. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे रंग तयार करू शकता.
तुम्हाला हिरवा रंग तयार करायचा असेल, तर तुम्ही पालक मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्या. लाल रंग तयार करायचा असेल, तर कुंकवाचे पाणी वापरा. त्याचप्रमाणे गुलाबी रंग तयार करायचा असेल तर बीटरूट वापरा आणि त्यात गुलाब पाणीही घाला. त्यामुळे गुलाबी रंगाला छान गुलाबासारखा वास येतो. निळा आणि जांभळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही खाण्याचा रंग देखील वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर या वर्षी नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी केली तर तुमच्या त्वचेचे देखील नुकसान होणार नाही आणि आपल्या पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही.