Bee Attack | अनेकवेळा आपण काही ठिकाणी मधमाशांचा हल्ला झालेला पाहिलेला आहे. मधमाशांचा हल्ला हा अत्यंत भयंकर असतो. वेळप्रसंगी हा हल्ला तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो. त्यामुळे जंगलात जाताना मधमाशांच्या पोळ्यापासून सावध राहणे, खूप गरजेचे आहे. मधमाशांचा डंक खूप जीवघेणा असतो. आजकाल अनेक ठिकाणी मधमाशांचा हल्ला होण्याचे प्रकार घडत आहेत.
छत्तीसगडमधील बिलोरी गावात बुधवारी मधमाशांनी गावकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 30 गावकरी जखमी झालेले आहेत. आणि त्यांना रुग्णालयात देखील दाखल केलेले आहे. हा प्रकार गावातील जत्रेच्या दरम्यान घडलेला आहे. जत्रेमुळे गावात पूजा करण्यात आली होती आणि या पूजेच्या धुरामुळे मधमाशांनी गावकऱ्यांवर हल्ला केला. परंतु जर मधमाशांनी हल्ला केला, (Bee Attack) तर त्यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. आता हल्ला केल्यावर आपण काय करावे? हे आपण जाणून घेणार आहोत.
धोका जाणवता दूर जा | Bee Attack
मधमाशी कधीही थेट किंवा सुरुवातीला हल्ला करत नाही. जर मधमाशी तुमच्या डोक्यावर गोंगाऊ लागल्या तर हल्ला करणार हे गृहीत धरा. आणि तिथून पळ काढा. कारण त्या ठिकाणी मधमाशांचा मोठा थवा हल्ला करू शकतो. अशावेळी तुम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही. त्यामुळे थोड्याशा मधमाश्या दिसल्या तरी तिथून पळ काढा.
वस्तू किंवा दगड मारू नका
अनेक लोक मधमाशांच्या आवाज आला की त्यांना हाताने हाकलण्याचा प्रयत्न करतात. कारण जेव्हा तुम्ही हात फिरवतो, तेव्हा मधमाशी त्यांच्या राणी मधमाशीला वाचवण्यासाठी तुमच्यावर तुटून पडतात. त्यामुळे मधमाशांच्या थव्यापासून दूर राहा. त्याचप्रमाणे दगड किंवा काठीने मारू नका.
चेहऱ्याचे आधी रक्षण करा
जेव्हा मधमाशांचा हल्ला होईल. तेव्हा सगळ्यात तुमच्या हातांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचे नाक, डोळे, तोंड यांसारख्या नाजूक अवयवांवर जर मधमाशींनी हल्ला केला तर तो पूर्ण भाग सुजतो आणि काळा देखील पडतो. चेहऱ्यावरील हे भाग खूप संवेदनशील असतात. त्यामुळे सगळ्यात आधी या भागाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.
पाण्यात उडी मारू नका
मधमाशीयांपासून वाचण्यासाठी अनेक लोक पाण्यात उडी मारतात. परंतु असे केल्याने मधमाशांपासून वाचता येणार नाही. त्याचप्रमाणे पाण्यात बुडण्याचा धोका देखील असते. त्यामुळे मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पाण्यात उडी मारू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकेल.