१८वर्षांवरील लसीकरणासाठी कसे कराल ‘रजिस्ट्रेशन’ ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयातील व्यक्तींना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून लसी देण्यात येईल.आतापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिक आणि फ्रंट लाईन वर्करना ही लस देण्यात येत होती. मात्र आता १८ वर्षांवरील व्यक्तींना देखील लस देण्यात येणार आहे . यासाठी तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी तुम्ही भरत सरकारच्या CoWIN या अँप/पोर्टल वर किंवा आरोग्यसेतू अँप Aarogya Setu वर करू शकता.

‘या’ लसी उपलब्ध

भारतात सध्या दोन कोविड लस दिल्या जात आहेत ज्यामध्ये हैदराबाद आधारित भारत बायोटेक ने विकसित केलेल्या कोवाक्सिन आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका द्वारा विकसित केलेल्या कोविशिल्ड यांचा समावेश आहे. ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. स्पुतनिक व्ही जी रशियामध्ये विकसित केली गेली होती. ती देखील उपलब्ध आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून तयार करण्यात येणाऱ्या लसीलाही भारतीय औषध नियामकांनी मान्यताही दिली आहे.

कोविन CoWIN पोर्टलद्वारे नोंदणी कशी करावी

१)कोविन वेबसाइटला भेट द्या आणि Register/Sign in वर क्लिक करा.
२)तुमचा मोबाईल नंबर टाइप करा आणि GET OTP वर क्लिक करा. OTP प्राप्त झाल्यानंतर, साइटवर अंक टाइप करा आणि ‘Verify’ वर क्लिक करा.
३)आता तुमची सर्व माहिती भरा. तुमचा फोटो, आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह आपले सर्व तपशील प्रविष्ट करा. एकदा हे झाल्यावर, नोंदणी ‘Register’ दाबा.
४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावापुढे ‘Schedule’ वर क्लिक करा.
५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.
६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.

ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे की, वापरकर्ते एकाच लॉगिनद्वारे चार सदस्यांची नोंदणी करू शकतो. आणि सहजपणे भेटीचे वेळापत्रक निश्चित करू शकतात.

आरोग्य सेतु Aarogya Setu अ‍ॅपद्वारे नोंदणी कशी करावी

१.आरोग्य सेतू Aarogya Setu अ‍ॅप उघडा आणि होम स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या (CoWIN tab) कोविन टॅबवर क्लिक करा.
२)‘लसीकरण नोंदणी’ ‘(Vaccination Registration)’ निवडा आणि नंतर आपला फोन नंबर प्रविष्ट करा. आपल्याला एक ओटीपी (OTP) प्राप्त होईल आणि नंतर आपण Verify’ वर क्लीक करून पुढे जाऊ शकता.
३)पुढच्या पानावर फोटो आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह सर्व तपशील प्रविष्ट करा. ‘नोंदणी’ (Register)वर क्लिक करा.
४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल (Schedule) करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावाच्या शेड्यूलवर(Schedule) क्लिक करा.
५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.
६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.

Leave a Comment