How To Remove Tanning From Neck | मानेवरील काळपट रंग चुटकीचरशी घालवा; पहा 3 सोप्पे उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Remove Tanning From Neck उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या चेहऱ्यासोबत मान खूप काळी पडते. आणि ही काळी पडलेली मान साबणाने किती घासली तरी निघत नाही. अनेकजण चेहरा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम वापरतात. पण मानेकडे जास्त लक्ष देत नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात हा काळपटपणा जास्तच वाढतो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, हा काळपटपणा नक्की कसा घालवावा? अनेक क्रीम वापरून देखील हा काळपटपणा जात नाही. आज आम्ही तुम्हाला या मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती सोप्या टिप्स सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या मानेवरील काळापाणा दूर होईल.

हळद आणि दही

तुमच्या मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही हळद आणि दहा याचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही दोन चमचे दह्यात अर्धा चमचा हळदी पावडर घाला आणि हे दोन पदार्थ एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या. त्यानंतर जवळपास 20 मिनिट तुमच्या चेहऱ्यावर या पेस्टने मसाज करा. आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता.

ऑलिव्ह ऑइल | How To Remove Tanning From Neck

आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिक्स करा. हा रस तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा. यामुळे तुमची काळी मान स्वच्छ होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे हे मिश्रण नैसर्गिक ब्लिचप्रमाणे काम करते. आणि तुमच्या मानेवरील काळेपणा देखील दूर होते.

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस काळेपणा आणि मळ दूर करण्यासाठी चांगले काम करतो. एक बटाटा घेऊन त्याचा रस काढा. तो एका कापसावर घेऊन मानेवर लावा. दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही रोज हा उपाय केल्याने खूप चांगला परिणाम दिसेल. तसेच तुमच्या मानेवरील काळपटपणा निघून जाईल. त्याचप्रमाणे तुम्ही खोबरेल तिला साखर मिसळून देखील मानेला लावली, तर तुमच्या मानेचा काळेपणा दूर होऊन जाईल. साखर हे एक नॅचरल स्क्रबप्रमाणे काम करते आणि तुमच्या काळपटपणा दूर होण्यास मदत करते.