पत्नीच्या मदतीने अशाप्रकारे वाचवा इनकम टॅक्स; जाणून घ्या महत्वपूर्ण मार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात. पण त्या गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स जर वाचवायचा असेल तर, तुम्हाला काही मार्गाचा वापर करावा लागेल . यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकता. पण हे सर्व तुमच्या पत्नीच्या मदतीने शक्य होऊ शकते. या टिप्स नुसार तुमची पत्नी तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकते, तसेच तुमची कमाईही दुप्पट होऊ शकते. तर चला जाणून घेऊयात या मार्गाबद्दल अधिक माहिती.

जॉईट होम लोन –

जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने एकत्र होम लोन घेतलं, तर दोन्ही व्यक्ती कलम 80C आणि 24(B) अंतर्गत स्वतंत्रपणे कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एकूण 7 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळवू शकता.

PPF तसेच NPS मधील गुंतवणूक –

तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नावावर पीपीएफ खाते उघडा. दोघं मिळून पीपीएफमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करा , जर हि गुंतवणूक केली तर तुम्हाला एकूण 3 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळेल. तसेच पत्नीच्या नावाने एनपीएस खाते उघडून गुंतवणूक केल्यास , त्यावर तुम्ही 50000 रुपयांची जास्त कर सवलत मिळवू शकता.

आरोग्य विमा –

तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेऊन, कलम 80D अंतर्गत तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकता. पती-पत्नी दोघंही स्वतंत्रपणे आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कर सूट मिळवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळेल.

बचत खाते आणि एफडी –

पत्नीच्या नावावर बचत खाते उघडा. त्यावर 10000 रुपयांपर्यंत व्याज उत्पन्नावर सूट मिळते. तसेच पत्नीच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास कर बोजा कमी होण्यास मदत होते. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या फायनान्शियल पोर्टफोलिओला मजबूत करू शकता आणि टॅक्स वाचवू शकता. तसेच तुमचे उत्पन्न दुप्पट करू शकता.