सेंड केलेला E- Mail समोरच्या व्यक्तीने पाहिला की नाही हे कसे पाहता येते? जाणून घ्या या ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकदा नोकरीसाठी किंवा ऑफिशीअल कामासाठी ई-मेलचा वापर आपल्याला करावा लागतो. ज्याप्रमाणे आपण व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या इतर सोशल मीडियावरती एखाद्या व्यक्तीला मेसेज सेंड केल्यानंतर त्या व्यक्तीने तो मेसेज पाहिला की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्लू टिक दिसते. आणि त्याद्वारे समजत की, समोरच्या व्यक्तीने आपला मेसेज पाहिला आहे. परंतु ही सुविधा ई-मेल ला नसते. मग ई-मेल हा समोरच्या व्यक्तीने पाहिला की नाही हे कसे समजणार? त्यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत.

कोणती आहे ही ट्रिक?

1) गुगल क्रोम:

गुगल क्रोम द्वारे आपल्याला समोरच्या व्यक्तीने आपला पाठवलेला ई-मेल सीन केला की नाही हे पाहता येते. आता ते कसे तर, गुगल क्रोम ओपन केल्यानंतर पेजवर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतात. त्यावरती क्लीक केल्यानंतर तुम्हाला more tools चा पर्याय दिसेल त्यावर्ती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला extension हा पर्याय दिसेल तो क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Get More Extensions वरती क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला दिसणाऱ्या सर्च बारमध्ये जाऊन Mailtrack for Gmail & Inbox :Email tracking लिहुन ते सर्च करावे लागेल. त्यानंतर ते डाउनलोड करून क्रोम मध्ये इन्स्टॉल करा.

हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचे Gmail login मागितले जाईल. ते लॉगिन केल्यानंतर ऍक्टिव्हेट मेलट्रॅक वर क्लिक करा. यानंतर ऍक्टिव्हेट झाला की तिथे येणाऱ्या Allow च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Gmail च्या टॅब मध्ये जा त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला मेल करायचा आहे तो यांमध्ये लिहा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा इतर व्यक्तीला मेल पाठवाल तेव्हा त्या व्यक्तीने तो मेल सीन केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि पहावी लागणारी रिप्लायची वाट बघावी लागणार नाही.

कसे कराल ऍक्टिव्हेट?

आपला मेल समोरच्या व्यक्तीने वाचला की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला MailTrack अँड -ऑन इन्स्टॉल करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर Gmail उघडावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला ‘Create Mail’ चा पर्याय वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला मेल सेंड करायचा आहे तो सेंड करताना सेंड या पर्यायाच्या बाजूच्या बटणावर क्लीक करून मेनू बारवर जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला येथे ड्रॉप-डाउन मेनूमध्ये तुम्हाला ‘इन्सर्ट फ्रॉम मेलट्रॅक’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ईमेल ट्रॅक निवडू शकता. अशा प्रकारे तुमची सेटिंग्ज सक्रिय होईल. आणि तुम्हाला मेल व्यक्तीने पाहिला आहे की नाही हे समजेल.