Monday, January 30, 2023

गर्लफ्रेंडसाठी हृतिक रोशनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय? लवकरच ‘मन्नत’मध्ये…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा हँडसम हिरो अशी ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशन हा काही ना काही कारणांनी नेहमीच चर्चेत येतो. सध्या तो एक आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम जाहीर करताना दिसत आहेत. आता हृतिकने सबासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सबा हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं ठरवलं आहे.

आपल्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेत दोघांनी एक घरसुद्धा निवडले आहे. मुंबईतील ‘मन्नत’मध्ये हे दोघं एकत्र राहणार आहेत. आता मन्नत म्हटल्यावर अनेकांना शाहरुख खानचा बंगला आठवत असेल. मात्र, हृतिक आणि सबा ज्याठिकाणी राहणार आहेत, त्या इमारतीचे नावसुद्धा मन्नत आहे.

- Advertisement -

मन्नतमध्ये वरचे मजले हे नव्याने बांधण्यात आले असून हृतिक आणि सबा लवकरच तिथे राहण्यासाठी जाणार आहेत. हृतिकने याआधी त्याच्या दोन घरांसाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ ही दोन घरं आहेत. आता सबासोबत राहण्यासाठी त्याने 30 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दोघांमध्ये आहे तब्बल 17 वर्षाचे अंतर…

एकमेकांना डेट करत असलेल्या हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचे अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केले होते. त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचे म्हटले जात. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.