HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या निकालाची वाट सगळे विद्यार्थी पाहत आहेत. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी 21 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबतचे अधिकृत सूचना देखील जाहीर झालेली आहे. आता अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक 9HSC Result 2024) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना तो पाहता देखील येणार आहे.
यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी या दरम्यान झाली. राज्याची जवळपास 15.13 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे 7लाख 60 हजार 46 विद्यार्थी कला शाखेसाठी 3 लाख 81 हजार 982 विद्यार्थी वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 29 हजार 905 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 225 आयटीआय साठी 4750 विद्यार्थ्यांचा समावेश होता मागील वर्षी बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागलेला होता. त्यामुळे उद्या नक्की काय निकाल लागणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.