हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन HSRP Number Plate । महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) HSRP (उच्च सुरक्षा नोंदणी पत्रिका) बसवण्याचे आवाहन राज्य परिवहन विभागाकडून मागील अनेक महिन्यापासून केलं जात आहे. हि नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी आतापर्यंत ३ वेळा सरकार कडून मुदत वाढवण्यात आली होती. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली आहे. तुम्ही आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हि नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवू शकता. या मुदतवाढीमुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यातील 40% वाहनचालकांनी नवीन HSRP नंबर प्लेट बसवलेली आहे. अजूनही बरेच जण वंचित आहेत. मुंबई, पुणे सह राज्यभरात लाखो वाहनमालकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही HSRP साठी अर्ज केलेला असेल पण प्लेट बसवलेली नसेल तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड बसू शकतो तर HSRP साठी अर्जही केलेला नसेल आणि प्लेट बसवलेली नसेल (HSRP Number Plate) तर मात्र तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांचा दंड बसेल. त्यामुळे वेळेतच हि नंबर प्लेट बसवून घ्या आणि कारवाई टाळा.
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. त्यावर ‘IND’ बॅजिंग असते. HSRP मध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-नंबर आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक यांसारख्या सुरक्षा फीचर्स मुळे वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यास मदत होईल. तसेच, बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे, फॅन्सी नंबर प्लेट बनवणे, नंबर प्लेटवर खाडाखोड करणे यामुळे चोरीच्या वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एचएसआरपी या नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आलं आहे
HSRP Number Plate कोठून लावावी? HSRP Number Plate
तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.transport.maharashtra.gov.in किंवा www.hsrpmh.com वर ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे. दुचाकींसाठी सुमारे ₹400-450, तीनचाकींसाठी ₹500 आणि चारचाकींसाठी ₹745-1,100. रंग-कोडेड स्टिकरसाठी अतिरिक्त ₹100 लागू शकतात. बुकिंगसाठी तुम्ही तुमच्या RTO नुसार झोन निवडून, फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट बुक करावी. HSRP फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच लावावी, जे परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे.




